Mizoram Election Exit Polls: मिझोरममध्ये कोणाचं सरकार? भाजप-काँग्रेसला संधी किती...एक्जिट पोलचे अनुमान समोर

Mizoram Election Exit Polls
Mizoram Election Exit Polls
Updated on

Mizoram Election Exit Polls: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपले असून आता 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. यापूर्वी विधानसभा निवडणुका 2023 च्या एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.

इंडिया टूडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, झोरम पीपल्स मुव्हमेंटला राज्यात मोठा विजय मिळत आहे. पक्षाला २८ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांच्या मिझो नॅशनल फ्रंटला केवळ ३ ते ७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

"जन की बात" एक्झिट पोलनुसार, यावेळी मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सरकार स्थापन होऊ शकते. 15 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर सत्ताधारी पक्षाला यावेळी 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मिझोरमबद्दल बोलायचे तर, न्यूज 18 च्या पोल ऑफ पोलमध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात यश मिळवले आहे. जनमत चाचण्यांमध्ये जेपीएमला 20 जागा मिळताना दिसत आहेत. त्याच वेळी, मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) 12 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Mizoram Election Exit Polls
Joshimath: धोकादायक 'जोशीमठ'च्या पुनर्रचनेसाठी केंद्राची मोठी घोषणा; मंजूर केला तगडा प्लॅन

मिझोरामच्या 40 जागांच्या विधानसभा मतदारसंघासाठी 7 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या होत्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत झोरमथांगाचा पक्ष 10 वर्षांचा वनवास संपवून सत्तेत परतला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, मिझोरमच्या मिझो नॅशनल फ्रंट आणि त्याचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी मंगळवारी मिझोराम विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकून जोरदार पुनरागमन केले होते. 2013 मध्ये मिझोराममध्ये विक्रमी जागा जिंकणारी काँग्रेस 5 जागांपैकी तिसऱ्या क्रमांकावर घसरली होती, तर झोरम पीपल्स मूव्हमेंट 8 जागा जिंकून विरोधी पक्षात बसली होती होती. (Latest Marathi News)

Mizoram Election Exit Polls
Telangana Assembly Elections: कोण कुणाची बी टीम? सत्तेत येण्यासाठी कुणाची होणार युती? जाणून घ्या तेलंगणाची चौरंगी लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.