Mizoram Election: मिझोराममध्ये पुन्हा येणार मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता; झोरामथांगा यांनी व्यक्त केला विश्वास !

Mizoram Assembly Elections
Mizoram Assembly Elections
Updated on

Mizoram Election: मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी व्यक्त केला आहे. तसेच, एमएनएफ या निवडणुकीत २५ ते ३५ जागा मिळवेल, असेही ते म्हणाले. मागील निवडणुकीत येथे ‘एमएनएफ’ने काँग्रेसला सत्तेतून हटविले होते. या वेळी निवडणुकीत काँग्रेसला भोपळा मिळेल,’’ असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. ‘‘आम्ही सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहोत. येत्या निवडणुकीत आम्ही पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असून, आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे.’’ ‘‘येत्या निवडणुकीत काँग्रेसला एक-दोन जागा जरी मिळाल्या, तरी आम्ही त्यांना भाग्यवान समजू; अन्यथा, काँग्रेसच्या हाती निवडणुकीत काहीच लागणार नाही,’’ असे मत त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना व्यक्त केले.

Mizoram Assembly Elections
Mizoram Election : मिझोरामच्या निवडणुकीत 'हा' मुद्दा ठरणार कळीचा; चुरशीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

काँग्रेसप्रमाणे भारतीय जनता पक्षालादेखील येत्या निवडणुकीत केवळ दोन जागा मिळतील किंवा त्यांचीही पाटी कोरीच राहण्याची शक्यता असल्याचे मत झोरामथांगा यांनी व्यक्त केले. ‘एमएनएफ’चा प्रमुख विरोधक असणाऱ्या झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) हा पक्षदेखील केवळ दहा जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व परिस्थितीचा विचार करता, आम्हाला या निवडणुकीत मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून ‘एमएनएफ’चा वाढलेला प्रभाव पाहता, तसेच काही दिवसांपासून ‘एमएनएफ’च्या बाजूने निर्माण झालेली लाट झाली असल्याने आम्ही सत्तेत पुन्हा येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले होता. आपल्या कारकिर्दीत कोरोनाचा कालखंड येऊनसुद्धा आपल्याला संपूर्ण मिझोराममध्ये विकास करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

Mizoram Assembly Elections
Mizoram मध्ये खाण कोसळून दुर्घटना, 12 जणांचे मृतदेह काढले बाहेर; BSF-NDRF चं बचावकार्य सुरू

मागील निवडणुकीतील स्थिती

मिझोराम विधानसभेच्या मागील निवडणुकीत २०१८ मध्ये ‘एमएनएफ’ने २६ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाला पाच जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला केवळ एका जागेवर यश मिळाले होते, तर ‘झेडपीएम’ला आठ जागांवर यश मिळाले होते.

काँग्रेसला चारदा सत्ता

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८७ मध्ये मिझो शांतता करार स्वीकारल्यानंतर, मिझोराम या नव्या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या ठिकाणी तीनवेळा सत्तेत आली आहे. तर, काँग्रेस पक्षाला येथे चारवेळा सत्ताप्राप्ती झाली आहे. ही निवडणूक जिंकल्यास ‘एमएनएफ’ला मिझोराममध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळू शकते.

Mizoram Assembly Elections
Mizoram Bridge Collapsed : मिझोराममध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला, 17 मजूर ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.