MK Stalin : राज्यातील सत्ता गेली तरी भाजपला विरोधच - स्टॅलिन

भाजपला विरोध करण्याच्या प्रयत्नांत आमची सत्ता गेली तरी आम्ही चिंता करणार नाही, असे सांगत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
MK Stalin
MK Stalinsakal
Updated on

चेन्नई - भाजपला विरोध करण्याच्या प्रयत्नांत आमची सत्ता गेली तरी आम्ही चिंता करणार नाही, असे सांगत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘सत्ताबदल झाल्यावर सूत्रे कोणाकडे असणार यावर चर्चा करण्याऐवजी सध्याची केंद्रातील सत्ता कायम राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहनही त्यांनी सर्व पक्षांना केले.

विरोधी पक्षांची पुढील बैठक १७ आणि १८ जुलैला कर्नाटकात होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना स्टॅलिन म्हणाले, ‘विरोधकांचे ऐक्य होत असल्याने भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच आपण पंतप्रधान आहोत हे विसरून मोदी काहीही बोलत आहेत.’ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट असल्याचे स्टॅलिन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.