अहमदाबाद : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी (MLA Jignesh Mewani) यांना आसामच्या एका न्यायालयाने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विनयभंगाच्या आरोपात जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याआधीही मेवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
(MLA Jignesh Mevani Bail Granted in Molestation Case)
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप नेत्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मागच्या गुरुवारी गुजरातमधील पालनपूर येथून आसाम पोलिसांच्या पथकाने पहिल्यांदा अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना आसामच्या एका न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण काही औपचारिक प्रक्रियेसाठी ३० एप्रिलला त्यांची सुटका करण्यात येणार असल्याचं त्यांचे वकील अंगसुमन बोरा यांनी सांगितलं. मेवाणी यांच्यावर सोशल मीडियावर पीएम मोदींविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
ज्या दिवशी त्यांना ट्विट प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला, त्या दिवशी मेवाणी पत्रकारांना बोलताना म्हणाले की, " माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे केलं असून भाजप आणि आरएसएसचे षडयंत्र आहे. ते पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्याचं काम करत आहेत. त्यांनी रोहित वेमुलाच्या सोबत पण हेच केलं. चंद्रशेखर आझाद यांच्यासोबतही हेच केलं असा आरोप त्यांनी माध्यमांना बोलताना केला.
ट्विट प्रकरणात जिग्नेशवर गुन्हेगारी कट रचणे, प्रार्थनास्थळाशी संबंधित गुन्हे, धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.