12.50 कोटी लोकांचे रोजगार गेले, 23 कोटी दारिद्य्ररेषेखाली; मोदी सरकार नेमकं काय करतंय?

Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या दरांनी शंभरी पार केली आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ (Petrol And Diesel Price Hike) नाही, तर ती मोदी सरकारीच (Modi Government) करवाढ आहे. त्यामुळे ती करवाढ जिझिया करासारखीच आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषेदत केली. तसेच, कोरोना काळात देशातील 12.50 कोटी लोकांचे रोजगार गेले, तर 23 कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली आले आहेत, त्यामुळे मोदी सरकार नेमकं काय करतंय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (MLA Prithviraj Chavan Criticizes Modi Government Over Petrol And Diesel Price Hike Satara Political News)

Summary

2014 च्या पूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणित युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाट वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

पेट्रोलचे दर शंभर, तर डिझेलचे दर 92 रुपये झाले आहेत, असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, "स्वयंपाक गॅस 900 रुपयांच्या घरात पोचला आहे. केंद्रातील मोदी सरकारची दरवाढ नसून करवाढ आहे. कोरोनासाठी दिलेल्या पॅकेजमधील रक्कम इंधन दरवाढीतून जिझिया कराच्या माध्यमातून वसूल करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्याचा निषेध करत आहोत. इंधन दरवाढ अशीच चालू राहिली तर महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.

Prithviraj Chavan
प्रयत्नांना यश न आल्याने चर्चेतून बाहेर पडलो : आमदार चव्हाण

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवीत सामान्य जनतेला मात्र, महागाईच्या खाईत लोटले आहे. या इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेस पक्ष देशभर व राज्यभर आंदोलन करीत आहे. आजही कॉंग्रेस पक्षातर्फे राज्यभर आंदोलने करण्यात आली. 2014 च्या पूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणित युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाट वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली.''

Prithviraj Chavan
जिल्हाधिकारी शेखर सिंह 'या' 25 प्रश्‍नांची उत्तरं द्या; खासदार उदयनराजेंचं थेट आव्हान
Petrol
Petrol

ही तर क्रूर थट्टाच

आमदार चव्हाण म्हाणाले, "देशात लसीकरणाच्या गोंधळाला केवळ मोदीच कारणीभूत आहेत. ते कोणाचे ऐकत नाहीत. ते कोणाचा सल्लाही घेत नाहीत. त्यामुळे देशात अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली आहे, कोरोना काळात देशातील 12.50 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत, तर 23 कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली आले आहेत. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची ज्या वेगाने दरवाढ केली आहे, ती क्रूर थट्टाच आहे.''

MLA Prithviraj Chavan Criticizes Modi Government Over Petrol And Diesel Price Hike Satara Political News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()