कऱ्हाड (सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) इस्त्राईलचा (Israel) दौरा केला. त्यानंतरच देशात ‘पेगॅसेस’चा (Pegasus) शिरकाव झाला आहे. हाही एक प्रकारचा देशावरील सायबर हल्लाच आहे. त्यामुळे देशातील हेरगिरी कोणी केली हे सिद्ध होते, असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) इस्त्राईलचा (Israel) दौरा केला.
जिल्हा काँग्रेस समितीच्या (Satara Congress Committee) कायदा विभागातर्फे येथील दौलतराव आहेर महाविद्यालयात अॅड. आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मरणार्थ विधी सल्ला शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्याख्याते युवराज नरवणकर, मुंबईचे अॅड. तुषार कदम, कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अमित जाधव, शहराध्यक्ष आप्पा माने, नगरसवेक इंद्रजित गुजर, अशोकराव पाटील, विजय मुठेकर उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘लोकसभेची निवडणूक लागली की पक्ष नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. पंतप्रधानपदाची शपथ घेतली की संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त तेथे जाऊन वेळ मिळाला तर बोलायचे. नाही तर भत्ता घ्यायचा आणि घरी जायचे. आपल्या देशात अमेरिका, इंग्लंडमध्ये नाही तो पक्षांतर बदलाचा वापर आता होऊ लागला आहे. पक्षांतर्गत कायदेबंदीचा पुनर्विचार करायला हवा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.