कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज भेट घेतली. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांनीही माजी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले होते. आता मोदींनी त्यांना बोलवले आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. मात्र, भेटीत काय झाले याची माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी टिप्पण्णी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केली. (MLA Prithviraj Chavan Criticizes Sharad Pawar-Narendra Modi Meeting Political News bam92)
गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही काहीजणांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत गोपनीय पत्र दिले होते. मात्र, ते पत्र फुटले आणि प्रकाशित झाले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेसची (Nationalist Congress Party) १९९९ पासूनची निवडणुकांची परंपरा सुरु आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Zilla Parishad Election) अपवाद सोडल्या, तर स्वबळावर सोडल्या आहेत. मात्र विधानसभा, लोकसभांची रणनिती ही केंद्रातून ठरते. अंतिम निर्णय श्रेष्ठी घेत असतात. प्रदेशाध्यक्ष पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवा, आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करु, असे सांगत आहेत. मात्र, त्याचा महाआघाडी सरकारवर काही परिणाम होईल, असा तर्क काढणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे चालेल. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. मात्र, अध्यक्षपदी कोण असेल हे काँग्रेस श्रेष्ठी ठरवतील.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आमदार चव्हाण म्हणाले, गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही काहीजणांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत गोपनीय पत्र दिले होते. मात्र, ते पत्र फुटले आणि प्रकाशित झाले. मात्र, त्यानंतर आम्हा सात लोकांशी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी यांच्यासमवेत पाच तास चर्चा केली. लवकरच त्यासंदर्भात निर्णय होईल, अशी आशा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार पडणार असे सांगत आहेत, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, विरोधी पक्षांतून सत्तेतील पक्षात जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी सरकार पडेल असे सांगणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे. त्यानुसार विरोधक ते सांगत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार भक्कम असून ते पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वासही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्य सहकारी बॅंकेला ११०० कोटींचा तोटा असल्याने रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमला. मी मुख्यमंत्री असताना असताना ४९ कारखाने कमी किमतीत विकले गेले. खासगी लोकांनी ते विकत घेतले त्याची चौकशी सुरु होती. चौकशीत काय निष्पन्न झाले ते सर्वांना माहिती आहे. एखादा भ्रष्टाचार होणे वेगळे आणि मनीलॉड्रींग होणे वेगळे. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात (Jarandeshwar Sugar Factory) मनीलॉड्रींगसंदर्भातील काही विषय आहे का, याची चौकशीसाठी ईडीची कारवाई असेल, असे मत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले.
ईडीची तडजोड होते की काय?
महाराष्ट्रात ईडीच्या (ED) एवढ्या चौकशा सुरु आहेत. मात्र, त्या शेवटपर्यंत जात नाहीत. कुठेतरी अडकून बसते. त्यात काय तडजोड होते की काय माहीत नाही, असा आरोप करुन आमदार चव्हाण म्हणाले, एकाही ईडीच्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आहे, ती शिक्षा कोर्टाने दिली आहे, हे माझ्या ऐकीवात नाही.
MLA Prithviraj Chavan Criticizes Sharad Pawar-Narendra Modi Meeting Political News bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.