Mobile Gaming Scam Religion conversion Of Minors : तुमच्या मुलांनाही मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन लागलं आहे? गेम खेळण्याच्या नावाखाली तासन् तास एकटे घालवतात? असं असेल तर पालकांनी सतर्क राहणं फार आवश्यक आहे. फार वेळ गेम खेळल्याने डोळ्यांच नुकसान हो तर तुम्हाला माहितच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे की की हल्ली गेम खेळून मुलांचे धर्मांतरही केले जात आहे.
दिल्ली जवळच्या गाझियाबादमध्ये एका उद्योजकाच्या मुलाचा गेम खेळताना धर्म बदलला. तो जीमला जाण्याच्या बहाण्याने ५ वेळा मस्जिदमध्ये जाऊन नमाज पढू लागला. त्याच्या हालचाली आणि हावभावावरून वडिलांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला तर तो नमाज पढताना सापडला. थोडा तपास केला तर त्याचे धागे मुंबईपर्यंत जोडले गेले. या संदर्भात आजवरच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
गेमिंग अॅपद्वारा अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करणाऱ्या टोळीविषयी पोलिसांनी बरेच महत्वाचे खुलासे केले आहेत. ही टोळी तीन टप्प्यांमध्ये धर्मांतर करते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मुलांना धर्मांतर करण्यासाठी उक्सवलं जातं. तिसऱ्य़ा टप्प्यात भटकवणारी भाषणे दाखवून ब्रेनवॉश करून कट्टर बनवलं जातं. नंतर धर्मांतर करून दुसऱ्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा टास्क दिला जातो. ही टोळी फारच चतुरपणे हळू हळू मुलांचे ब्रेनवॉश करते.
राजनगर येथील उद्योगपतीने ३० मे रोजी कविनगर पोलिस स्टेशनमध्ये आपल्या एकुलत्या एक अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराची केस नोंदवली होती. तपासात समोर आलं की, संजयनगरमधील धर्मस्थानाचे धर्मगुरू अब्दुल रहमान आणि मुंबईचे बद्दो या टोळीचे सदस्य आहेत. त्यांनी गाझियाबादचे २, फरीदाबाद आणि चंडीगढच्या १-१ अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केल्याचे कबुल केले.
यासंदर्भात सुरक्षा एजंसिजपण सक्रिय झाल्या आहेत. पोलिसांनी ज्या धर्मगुरूला पकडलं त्याने अनेक मुलांचं धर्मांतर केलं आहे. त्याने एनसीआरच्या चार मुलांचे धर्मांतर केले आहे. अंदाज आहे की, या टोळीने देशभरात हजारो अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले आहे.
ही टोळी खोट्या आयडीवरून गेम हरल्यावर अल्पवयीन मुलांना धार्मिक ग्रंथांचा काही भाग या मुलांना वाचयला पाठवते. जे वाचून मुलं गेम जिंकायचे. दर वेळी हेच केलं जातं. त्यानंतर आपला धर्म आणि समाज कसा चांगला हे सांगणारे काही व्हिडीओ दाखवले जातात.
प्रकरण समोर कसं आलं?
राजनगरच्या उद्योजकाचा मुलगा मोबईल गेम खेळायचा. तो जीम जाण्याच्या बहाण्याने मस्जिदीत जाऊन नमाज पढू लागला. शिवाय टोळीच्या इतर लोकांशी फोनवर तासन् तास गप्पा मारू लागला. पोलिसांनी या केसमध्ये धर्मगुरू अब्दुल रहमान उर्फ नन्नी यांना अटक केली. डीसीपींच्या म्हणण्यानुसार आरोपीच्या व्हॉट्सअॅप वर धर्मांतराविषयी अनेक आक्षेपार्ह चॅट मिळाल्या आहेत.
शपथ पत्रावर जबरदस्ती सही
पोलिस सांगतात की, आरोपींनी संजयनगरमधल्या उद्योजकाच्या मुलाबरोबर अजून एका अल्पवयीन मुलांचे धर्मांतर केले होते. त्याचे वडिलाचे लहानपणीच निधन झाले, आई कोरोना काळात गेली. आरोपीने या मुलाकडून शपथ पत्रावर जबरदस्ती सही करून घेतली होती. ज्यात तो आपल्या मर्जीने धर्मांतर करत आहे असं लिहिलं होतं.
डिस्कॉर्ड अॅपने चॅटिंग
या अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉश करण्यासाठी टोळी डिस्कॉर्ड अॅप वापरत. या मुलांना या अॅपद्वारे जोडून त्यांच्या धर्मातल्या कमतरता आणि दुसऱ्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगतात. चॅटिंगकरून त्यांना धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिलं जातं. धर्म बदलल्यावर त्यांना पुढच्या प्रक्रियेशी जोडलं जातं.
फोर्ट नाइट अॅपद्वारा गेमिंग
अल्पवयीन मुलांमध्ये गेमिंग अॅप विषयी फार उत्सुकता आणि उत्साह असतो. याचाच फायदा घेऊन ही टोळी फोर्ट नाइट अॅपवर आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करते. टोळीचे सदस्य नाव बदलून गेम खेळतात. जिंकण्यासाठी ते दुसऱ्या धर्माची पुस्तक वाचायला देत. मग ते टोळी सदस्य जाणूनबूजून हरतात, म्हणजे त्या मुलांमध्ये दुसऱ्या धर्माविषयी विश्वास वाढेल.
भाषणांनी छाप पाडायचे
अल्पवयीन मुलाचे धर्मांतर करून कट्टरतावादी झाल्यानंतर त्याला झाकीर नाईक या कट्टरपंथी धर्मोपदेशकाचा एक व्हिडिओ पाठवण्यात आला होता, ज्याला भारतात बंदी आहे. अल्पवयीन मुलांना अधिक कट्टर बनवण्यासाठी त्यांना धार्मिक नेते तारिक जमील यांचे व्याख्यान दाखवण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.