MP Sanjay Singh : ...ही तर न्यायव्यवस्थेची चेष्टा; खासदार संजय सिंह यांची केंद्रावर टीका

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘सीबीआय’ने अटक केल्यावरून आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.
aap party mp Sanjay Singh
aap party mp Sanjay Singhsakal
Updated on

नवी दिल्ली - मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘सीबीआय’ने अटक केल्यावरून आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सीबीआय’ने केजरीवाल यांना अटक केल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी केजरीवाल यांना नुकतीच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी, २६ जून रोजी केजरीवाल यांची सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

संजय सिंह केंद्र सरकारला उद्देशून म्हणाले, की तुम्ही न्यायव्यवस्थेची खिल्ली उडविली आहे. या देशाच्या राज्यघटनेबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचीही मस्करी केली आहे. केंद्राने या प्रकरणी दोन वर्षांनंतर बनावट खटला दाखल केला आहे. सिंह यांनी या वेळी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयवरही न्यायालयाच्या अवमानाचा आरोप केला.

ते म्हणाले, की या तपाससंस्थांनी कसलेही पुरावे नसताना आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध गुन्ह्यांमागून गुन्हे दाखल केले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे, न्यायालयाने याची स्वत:हून दखल घ्यावी, अशी माझी विनंती आहे.

ईडीकडे केजरीवाल यांच्याविरुद्धही आर्थिक गैरव्यवहाराचा पुरावा नसून तपाससंस्था केजरीवाल यांच्याकडून पैसे वसूल करण्यास असमर्थ ठरली आहे. ईडीकडे केजरीवाल यांच्याविरुद्ध पुरावे नसून ईडी द्वेषपूर्ण हेतूने काम करत असल्याचे दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाच्या आदेशातही म्हटले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने घटनाबाह्यपद्धतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असेही ते म्हणाले.

केजरीवालांच्या अटकेविरोधात संसदेत करणार आंदोलन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोमवारी संसद भवनात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार तपास संस्थांनी केजरीवाल यांना अटक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांच्याकडे एक पैसा सापडलेला नाही, अशी टिप्पणी राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना जामीन देताना केली होती.

त्यानंतर ईडीचे अधिकारी उच्च न्यायालयात गेले होते. ईडीची ही कृती घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचा आरोप करत सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार केजरीवाल यांना अटक झाली आहे. या अटकेविरोधात संसदेत आंदोलन केले जाणार असून त्यात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.