नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे १०० दिवस आज पूर्ण झाले. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सरकारच्या कामांची माहिती दिली. पण लोकसभा निवडणुकीपूर्वीच पुन्हा सत्तेत आल्यास पहिल्या १०० दिवसांत मोठा धाडसी निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. पण सरकारनं असा कुठलाही धाडसी निर्णय घेतल्याचं दिसून आलेलं नाही. या निर्णयाचं नेमकं काय झालं? पण आता १०० दिवसांनंतर कुठला निर्णय घेतला जाऊ शकतो, जाणून घेऊयात.