नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना विषाणूने (Corona Virus) धुमाकूळ घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सध्या जगभरात चिंतेचा विषय ठरला आहे. भारतात सापडलेल्या व्हेरिंयटचा प्रसार इतर जगभरात होऊ नये म्हणून बहुतांश देशांनी भारतातून प्रवासास बंदी घातली आहे. मात्र, हा व्हेरियंटला भारतीय (Indian variant) व्हेरियंट म्हणण्यावरुन केंद्र सरकारने आता आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना आदेश दिलाय की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन (social media firms) कोरोना व्हायरसच्या भारतीय व्हेरियंटसंदर्भातील बातम्यांना काढून टाकावं. या आदेशाबाबतची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. 11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसचा सर्वांत आधी भारतात आढळलेला B.1.617 व्हेरियंट हा जागतिक चिंतेचा विषय बनू शकतो. (Modi Government asks social media firms to remove reference to Indian variant of coronavirus)
सरकारच्या वतीने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एक पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये म्हटलंय की, मीडिया रिपोर्ट्समध्ये B.1.617 ला कोणत्याही आधारशिवाय तसेच तथ्याशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणून सादर केलं गेलं आहे. आयटी मंत्रालयाने सर्व कंपन्यांना म्हटलंय की, त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन अशा सर्व बातम्यांना आणि पोस्ट्सना डिलीट करावं ज्यामध्ये B.1.617 व्हेरियंटला 'इंडियन व्हेरियंट' नावाने संबोधलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याचं वर्गीकरण घातक व्हायरसमध्ये केलं आहे. B.1.617 कोरोनाचा एक नवा व्हेरियंट जरुर आहे मात्र त्याला 'भारतीय' म्हणणं बरोबर नाहीये. पत्रात म्हटलंय की B.1.617 ला भारतीय व्हेरियंट म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. इतकंच काय WHO ने देखील या व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हटलं नाहीये. मात्र या पत्राला सार्वजनिक केलं गेलं नाहीये.
रॉयटर्सला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलंय की, हे पत्र सोशल मीडिया कंपन्यांना सक्तीने पाठवलं गेलंय. पत्रात म्हटलंय की, कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटला कोणत्याही आधाराशिवाय भारतीय व्हेरियंट म्हणणं देशाची प्रतिमा खराब करणारं आहे. अशा रिपोर्ट्समुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आहे. तर एका सोशल मीडिया कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं की, प्लॅटफॉर्मवरुन हजारो-लाखोंचा कंटेट एकावेळेस हटवणं खूपच अवघड काम आहे. विकीपीडीयावर देखील Lineage B.1.617 नावाने एक पेज आहे ज्यामध्ये B.1.617 ला कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हटलं आहे. विकीपीडियाच्या माहितीनुसार B.1.617 कोरोनाचा एक व्हेरियंट आहे जो सर्वांत आधी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात आढळला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.