Affordable Medicine : स्वस्त औषधांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, लाँच केलं खास अ‍ॅप! जाणून घ्या

या ॲपच्या मदतीने महागड्या औषधांना स्वस्त पर्याय मिळू शकतो.
Affordable Medicine App
Affordable Medicine AppeSakal
Updated on

औषधांच्या वाढत्या बिलांचा तुम्हालाही त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. कारण केंद्र सरकारने नुकतेच 'फार्मा सही दाम' नावाचे ॲप लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहकांचा ब्रँडेड औषधांप्रमाणे गुणकारी औषधं कमी दरात मिळण्यास मदत होणार आहे. (Pharma Sahi Daam App)

हे ॲप नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने विकसित केले असून ते अँड्रॉइड आणि iOS दोन्ही वापरकर्ते वापरू शकतात. ग्राहकांना स्वस्तात समान दर्जाच्या ब्रँडेड औषधांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच, या ॲपच्या मदतीने महागड्या औषधांना स्वस्त पर्याय मिळू शकतो.

Affordable Medicine App
‘ईसीएचएस’मार्फत लाभार्थ्यांना विशेष सुविधा पेरेंट पॉलिक्लिनिकऐवजी इतर ठिकाणहूनही मिळणार १५ दिवसांपर्यंतची औषधे

ॲप कसे काम करते?

जर तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या आजारासाठी ब्रँडेड औषध लिहून दिले असेल तर तुम्ही ॲप च्या मदतीने त्याचा स्वस्त पर्याय शोधू शकता. यासाठी तुम्हाला ॲप मध्ये औषधाचे नाव टाइप करावे लागेल. मग ते तुम्हाला ब्रँडेड औषधांच्या स्वस्त पर्यायांची संपूर्ण यादी दाखवेल. जे तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता.

हे लक्षात ठेवा की ही औषधे वेगवेगळ्या नावांनी उपलब्ध असू शकतात, परंतु या औषधांचे गुणधर्मही तेच राहतील आणि त्यांची क्रियाही तीच असेल.

उदाहरण द्यायचे झाल्यास, ऑगमेंटिन हे भारतात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या औषधांपैकी एक आहे. या ब्रँडेड औषधाच्या १० गोळ्यांची किंमत सुमारे २०० रुपये आहे. पण या ॲपमध्ये तुम्हाला या औषधाचे किमान १० पर्याय सापडतील जे त्यापेक्षा खूपच स्वस्त आहेत. या गोळ्या ८-१० रुपयांना विकत घेता येतील. त्याचप्रमाणे पॅन डीच्या १५ कॅप्सूलची किंमत १९९ रुपये आहे आणि त्याच फॉर्म्युलासह दुसर्‍या औषधाच्या १० कॅप्सूल केवळ २२ रुपयांना विकत घेता येतील.

केंद्र सरकारचा वाटा महत्त्वाचा

भारतातील औषधांची किंमत ही इतर वस्तूंप्रमाणे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. मात्र, ३३ टक्क्यांहून अधिक औषधांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण आहे. म्हणजेच या औषधांच्या किमती मनमानी वाढवता येणार नाहीत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने अत्यावश्यक औषधांची यादी तयार केली आहे आणि त्यांच्या किमतींवर नियंत्रण ठेवले आहे. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर (DPCO) अंतर्गत ३५५ औषधांच्या आणि त्यांच्या ८८२ फॉर्म्युलेशनच्या किंमती भारतात निश्चित केल्या गेल्या आहेत.

Affordable Medicine App
48 Drugs Fail Latest Quality Test: नियमीत वापरली जाणारी तब्बल ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल; सीडीएससीओने जारी केला अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.