मोदी सरकारकडून मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; राज्यपालांचा गौप्यस्फोट

Satya Pal Malik
Satya Pal Malikesakal
Updated on
Summary

'येत्या सहा-सात महिन्यांत माझा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपणार आहे.'

मेघालयाचे (Meghalaya) राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) सडकून टीका केलीय. पीएम मोदींची (PM Narendra Modi) खिल्ली उडवत मलिक म्हणाले, भाजप सरकारनं मला राष्ट्रपतीपदाचं आमिष दाखवलं आणि तुम्ही गप्प राहिलात, तर तुम्हाला राष्ट्रपती बनवलं जाईल, असं म्हंटलं होतं. दरम्यान, तीन कृषी कायदे (Agricultural laws) रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिकांनी केलाय.

येत्या सहा-सात महिन्यांत माझा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर मी उत्तर भारतातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी एक प्रचार मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत मलिक म्हणाले, आम्ही 700 हून अधिक शेतकरी गमावले आहेत; पण एका कुत्रीच्या मृत्यूवर पत्र लिहिणाऱ्या पंतप्रधानांनी त्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवर एक शब्दही काढला नाही, असा घणाघातही त्यांनी केलीय.

Satya Pal Malik
'फडणवीसांनी नवाब मलिकांवर त्याचवेळी का कारवाई केली नाही?'

मेघालयाचे राज्यपाल शेतकऱ्यांच्या आरोपांचं समर्थन करत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूनं न बोलल्यास त्यांना अध्यक्षपदी बढती दिली जाईल, असं भाजपमधील (BJP) त्यांच्या काही मित्रांनी सांगितल्याचा दावाही मलिकांनी केलाय. भाजपनं मला राष्ट्रपती पदाची ऑफर दिली. मात्र, ती मी नाकारली. कारण, मला पदापेक्षा शेतकरी अधिक महत्वाचा वाटतो. त्यामुळं राज्यपाल, सभापती ही पदं माझ्यासाठी काहीच नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट शब्दांत भाजला सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.