Cheap Loan For Women: नुकतेच मोदी सरकारने 33% आरक्षण देऊन महिलांना एक मोठे गिफ्ट दिले होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण देशात कौतुक झाले. विरोधकांनीही याला समर्थन दिले. मात्र आता मोदी सरकार महिलांना अजून एक मोठे गिफ्ट देण्यासाठी सज्ज झाले आहे.
मोदी सरकार महिलांना स्वस्त कर्ज देणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महिलांना मदतच होणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश सह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अश्यावेळी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामुळे महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोदी सरकार हा निर्णय घेत आहे असे म्हटले जात आहे.
येणाऱ्या या निवडणुकांमध्ये महिला कोणाला मतदान करतात हे अतिशय महत्त्वाच ठरणार आहे. अशावेळी महिलांना सशक्त करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार अजून एक पाऊल उचलत असून नरेंद्र मोदी सरकार आता महिलांना स्वस्त कर्ज देण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हटले जात आहे.
महिलांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय आनंदाचा असून हा निर्णय घेतल्यावर महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सशक्त होण्यास मदत मिळणार आहे. नवरात्रोत्सवात याची घोषणा होईल असे म्हटले जात आहे. याविषयी केंद्र सरकार कामालाही लागले असल्याचे म्हटले जात आहे.असे वृत्त सामने प्रसारित केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.