मोदी म्हणजे Tiger of Hindutva; साध्वीचं ट्विट

PM Modi
PM Modi
Updated on
Summary

सध्या एकच पर्याय आहे तो म्हणजे मोदी असं म्हणत साध्वी प्राची यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.

बजरंग दलाच्या शौर्य संचलनाच्या कार्यक्रमात हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची (Sadhvi Prachi) यांनी आता फक्त राम मरंदिराची निर्मिती सुरु आहे. लवकरच मथुरा आणि काशीमध्येही भव्य मंदिरांची उभारणी होईल असं म्हटलं होतं. राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी ही आपल्यासाठी शौर्याचा विषय आहे असंही साध्वी प्राची म्हणाल्या होत्या.

ट्विटरवर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) एक फोटो शेअर केला आहे. तो शेअर करताना सध्या एकच पर्याय आहे तो म्हणजे मोदी असं म्हटलं आहे. तसंच मोदींना 'टायगर ऑफ हिंदुत्व' असंही साध्वी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याबाबत आक्षेपार्ह टीप्पणी काँग्रेसच्या ट्विटरवर करण्यात आली होती. यावरून टीका करताना साध्वी प्राची यांनी म्हटंल की, काँग्रेस दुटप्पी राजकारण करत आहे. मंचावर महिलांचा गौरव करायचा, त्याचा दिखावा करायचा. प्रत्यक्षात महिलांचा सन्मान करण्यापासून काँग्रेस कोसो दूर आहे. काँग्रेस अशा राजकारणामुळेच सत्तेपासून दूर आहे.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'ड्रॅगन'ला प्रत्युत्तर

कोण आहेत साध्वी प्राची?

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील असलेल्या साध्वींचा जन्म सिरसली गावात झाला. त्यांचे कुटुंब हे आर्य समाजातील आहे. आई वडिलांसह कुटुंबात तीन भाऊ आणि एक बहिण असते. या सर्व भावंडांमध्ये साध्वी प्राची या सर्वात मोठ्या आहेत. त्यांचे वडील हरबीर सिंह आर्य हे सरकारी कॉलेजात शिक्षक होते.

2015 मध्ये यांनी एका कार्यक्रमात चार मुलं जन्माला घाला असं वक्तव्य साध्वी प्राची यांनी केलं होतं. तेव्हा टीका झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं होतं की, मी चार मुलं जन्माला घाला म्हटलं तर भूकंप आला. पण हे जे ४० मुलं जन्माला घालतात आणि लव्ह जिहाद पसरवतात त्यांच्यावर कोणी बोलत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()