मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला अन् लागले 'मोदी-मोदी'चे नारे! पोलिसही चक्रावले, नेमकं काय घडलं?

CM Ashok Gehlot News
CM Ashok Gehlot News
Updated on

CM Ashok Gehlot News: राजस्थानचे मुख्यमंत्री काँग्रेसनेते अशोक गेहलोत भिलवाडा येथे पोहोचले तेव्हा शहरातील एका ठिकाणी गर्दी पाहून त्यांचा ताफा थांबला. यावेळी लोकांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासमोर ‘मोदी-मोदी’, अशा घोषणा दिल्या. हे पाहून मुख्यमंत्री आपल्या वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी हसतमुखाने घोषणाबाजी करणाऱ्या लोकांचे स्वागत स्वीकारले आणि पुढे सरकले.

भिलवाडा जिल्हा मुख्यालयात असलेल्या नगर परिषदेच्या महाराणा प्रताप सभागृहात मिशन 2030 संदर्भात मुख्यमंत्रू अशोक गेहलोत भिलवाडा जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला. या संवादानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांचा ताफा भिलवाडा सर्किट हाऊसकडे रात्रीच्या विश्रांतीसाठी रवाना झाला.यावेळी नगरपरिषदेच्या मागे सरस्वती सर्कल येथे मोठ्या संख्येने तरुण उभे होते. जिथे मुख्यमंत्र्यांचा ताफा तरुणांना पाहून थांबला.

यावेळी तरुणांनी मुख्यमंत्र्यांसमोर मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. यादरम्यान गेहलोत त्यांच्या कारमधून उतरले, हात जोडून सर्वांचे स्वागत केले, हसले आणि परत कारमध्ये बसले आणि थापा तेथून निघून गेला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या प्रस्थानावेळी तरुणांनी जय श्री रामचा जयघोषही केल्या, आज-तकने याबाबत वृत्त दिले आहे. (latest marathi news)

CM Ashok Gehlot News
MK Stalin: मुलगा उदयनिधींच्या 'सनातन' विधानावर CM स्टॅलिन यांनी सोडलं मौन! PM मोदींना दिला सल्ला

मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबल्यानंतर तरुणांनी गेहलोत यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यावर भिलवाड्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी देखील चक्रावले. हा प्रकार पाहून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीभोवती बंदोबस्त ठेवला, मात्र तरीही तरुण मोदी-मोदीच्या घोषणा देत होते.

गेहलोत यांच्यासमोर 'मोदी-मोदी'च्या घोषणा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर्षी एप्रिलमध्ये जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात सामना झाला आणि तो सामना पाहण्यासाठी सीएम गेहलोतही आले होते. जेव्हा ते प्रेक्षक गॅलरीत बसून सामन्याचा आनंद घेत होते, तेव्हा स्टेडियममधील लोकांनी त्यांच्यासमोर ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या होत्या. 

CM Ashok Gehlot News
Aditya L1 Selfie : 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.