बोकारो: ‘‘झारखंडमध्ये सत्तेत आल्यास राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस सरकारने तयार केलेल्या पेपरफुटी माफिया आणि भरतीप्रक्रिया माफिया यांना तुरुंगात टाकू’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी केला. झारखंडमधील बोकारो येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.