Modi Took Charge as PM: मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; कार्यभार स्वीकारताच घेतला हा मोठा निर्णय!

Modi took charge of pm today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय.
narendra modi
narendra modieSakal
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी झाला असून याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी २०, ००० कोटींचा खर्च सरकारला आला आहे.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरु हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

narendra modi
Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

पंतप्रधान मोदी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं की, 'आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध आहोत.आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त काम करणार आहोत. यासाठीच आमचे सरकार आतापर्यंत काम करत आले आहे आणि पुढेही काम करत राहील.' किसान सन्मान निधीचा १६ वा हफ्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज सतरावा हफ्ता जारी करण्यात आला.

narendra modi
Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी; किंग खान आणि खिलाडी अक्षयच्या 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये जमा केले जातात. हे पैसे तीन हफ्त्यामध्ये जमा केले जातात. २०००-२००० हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय मोदींनी पुढील १०० दिवसांचा आराखडा देखील तयार केला आहे. त्यानुसार काम करण्याच्या सूचना मंत्रिमंडळाला देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()