लोक पंतप्रधान मोदी,भाजपवर संतापले; देश विकला जातोयचा सूर

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत.
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदीe sakal
Updated on

नवी दिल्ली - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या दरवाढीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे दरवाढीतून मिळणाऱ्या पैशातून लसीकरण, विकास कामे होत आहे. आज रविवारी (ता.३१) #Modi_Burns_India हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. एकूण ४२ हजाराच्या वर लोकांनी इंधन दरवाढीसह विविध कारणांसाठी मोदी जबाबदार असल्याचे ट्विट करुन संताप (PM Narendra Modi) व्यक्त केला आहे. (Petrol Diesel Price Hike)

पंतप्रधान मोदी
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,१४ जणांचा मृत्यू अन् पाच जण गंभीर जखमी

अमित शहा गेल्या सात वर्षांमध्ये मोदी राजवटीतील विकास शोधत असल्याचा टोला ट्रोल माफिया या ट्विटर हँडलवरुन लगावण्यात आला आहे. हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी देशात सुरु असलेल्या जमातवादी, खासगीकरणावर जोरदार टीका केली आहे. एकाने भाजप भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकांना उद्ध्वस्त करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.