RSS Explainer: लोकसभा निवडणुकीनंतर संघ एवढा अ‍ॅक्टिव्ह का? संघाची समन्वय बैठक काय असते? त्यात नेमकं होतं काय?

Mohan Bhagwat News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीमध्ये संघाचे ३६ सहकारी किंवा सहकारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होतात. यामध्ये भाजपसोबतच स्वदेशी जागरण मंच, शिक्षण मंडळ, सेवा भारतीसारख्या संघटना सहभागी होतात. राष्ट्रीय स्तरावरच्या समन्वय बैठकीमध्ये संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी, जसं-सरसंघचालक, सरकार्यवाह सहभागी होतात.
rss meeting
rss meetingesakal
Updated on

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सातत्याने बैठका सुरु आहेत. उत्तर प्रदेशापासून ते मध्य प्रदेशापर्यंत संघाकडून समन्वयकांच्या बैठका बोलावल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बंद दाराआड बैठक झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या अनुषंगाने आणि भविष्यातील वाटचालीच्या संदर्भाने लोक या बैठकीकडे बघत आहेत.

संघ अचानक अॅक्टिव्ह?

आरएसएसला जवळून बघणारे आणि ऑर्गनायझर मॅगझीनचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी 'न्यूज १८ हिंदी'सोबत संवाद साधला. ते म्हणाले की, समन्वय बैठक ही संघाचा रुटीन कार्यक्रम आहे. समन्वय बैठक मुख्यतः दोन पद्धतींची असते. पहिली आहे क्षेत्रीय अथवा प्रांत स्तरावरील बैठक आणि दुसरी राष्ट्रीय स्तरावरील बैठक. राष्ट्रीय स्तरारील बैठकीला अखिल भारतीय समन्वय बैठक म्हटलं जातं. केतकर सांगतात की, संघाचं पूर्ण वर्षाचं शेड्यूल ठरलेलं असतं. ज्याची सुरुवात मार्च महिन्याच्या जवळपास प्रतिनिधी सभेने होते.

rss meeting
भारीच! ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ची ८.५ कोटींची मदत, जय शाह यांची घोषणा

समन्वय बैठकीत कुणाचा सहभाग असतो?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीमध्ये संघाचे ३६ सहकारी किंवा सहकारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होतात. यामध्ये भाजपसोबतच स्वदेशी जागरण मंच, शिक्षण मंडळ, सेवा भारतीसारख्या संघटना सहभागी होतात. राष्ट्रीय स्तरावरच्या समन्वय बैठकीमध्ये संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी, जसं-सरसंघचालक, सरकार्यवाह सहभागी होतात.

समन्वय बैठकांमध्ये नेमकं काय होतं?

आरएसएसच्या समन्वय बैठकीत मुख्यतः दोन मुद्द्यांवर चर्चा होते. पहिल्या प्रकारात देशहिताशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होते तर दुसऱ्या प्रकारात संघटनेच्या धोरणाशी संबंधित मुद्दे असतात. संघाच्या प्रत्येक संघटना आपापले मुद्दे मांडतात. त्यानंतर एकमत तयार होतं आणि पुढे जाण्याचा मार्ग निश्चित होतो.

rss meeting
Ajit Pawar: अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार, भाजपसोबत असलेल्या अजितदादांची प्रतिक्रिया काय?

लोकसभा निवडणुकीनंतर पहिली राष्ट्रीय समन्वय बैठक

संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक याच महिन्यात ३१ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. केरळ येथील पलक्कड येथे ही नियोजित बैठक होईल. या बैठकीमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत आलेलं अपुरं अपयश, यावर चर्चा होऊ शकते. सरकारमध्ये सहभागी झालेल्या दुसऱ्या पक्षाच्या मागण्यांवर विचार होऊ शकतो.

संघाची मागची समन्वय बैठक पुण्यात संपन्न झाली. राजकीय जाणकार सांगतात की, यावेळी बैठकीसाठी केरळची निवड करण्यात आलेली आहे. कारण पहिल्यांदाच भाजपने केरळमध्ये आपलं खातं उघडलं आहे. या बैठकीच्या माध्यमातून संघाकडून भाजपला एक मेसेज दिला जाऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीनंतर संघाकडून वारंवार भाजपवर हल्ले होत आहेत. विशेषतः अजित पवार यांना सोबत घेण्यावरुन संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात संघाची भूमिका काय असेल? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.