मंकीपॉक्स जागतिक आणीबाणी? WHO ने दिला निर्णय

जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा धोका वाढताना दिसत आहे.
Monkeypox
Monkeypoxesakal
Updated on

जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा धोका वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) बैठक पार पडली. मंकीपॉक्स विषाणू अद्याप जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) नाही, असा निर्णय डब्ल्यूएचओने बैठकीमध्ये घेतला आहे. जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं आपात्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Monkeypox
GST Council Meeting: वाढता टॅक्स लावणार खिशाला कात्री, हॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी मंकीपॉक्स विषाणूच्या झपाट्यानं पसरणाऱ्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकत आहे. पण सध्या मंकीपॉक्स विषाणूला कोरोना (Coronavirus) आणि पोलिओ (Polio) प्रमाणे जागतिक आरोग्य आणिबाणी घोषित करण्याची गरज नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी मंकीपॉक्सच्या (Monkeypox) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. काही शास्त्रज्ञांच्या मते, केवळ पश्चिमेकडील देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाल्यामुळे WHO मंकीपॉक्सला जागतिल आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा विचार करत आहे.

Monkeypox
सात ते १२ वयोगटातील मुलांना दिल्या जाणाऱ्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी

मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करणे म्हणजे संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनेला (UNO) मंकीपॉक्स विषाणूचा उद्रेक अधिक जोमानं जगभरात पसरण्याची भीती आहे. देते. कोरोना विषाणू आणि पोलिओचा नायनाट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांप्रमाणे मंकीपॉक्स विषाणू संसर्गावरही पाऊलं उचलावी लागतील.

मंकीपॉक्स हा एक मोठा डीएनए विषाणू आहे जो ऑर्थोपॉक्स विषाणू आहे. व्हॅरिओलाच्या विपरीत, स्मॉलपॉक्स विषाणूशी संबंधित विषाणू, जो केवळ मानवांना प्रभावित करतो, मंकीपॉक्स विषाणू आफ्रिकेच्या काही भागांमध्ये उंदीर आणि इतर प्राण्यांमध्ये आढळतो.

ऑर्थोपॉक्स विषाणू हे स्थिर व्हायरस आहेत जे जास्त बदलत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()