दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण; देशातील रुग्णांची संख्या नऊवर

Monkeypox Outbreak 31 year old woman tests positive for monkeypox in delhi india tally rises to nine
Monkeypox Outbreak 31 year old woman tests positive for monkeypox in delhi india tally rises to nine
Updated on

Monkeypox Cases in India : कोरोनानंतर आता देशात मंकीपॉक्सचं संकट वाढताना दिसत आहे. दिल्लीतील आणखी एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आल्याने चिंता वाढली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, 31 वर्षीय नायजेरियन महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, ती देशातील पहिली महिला आहे ज्यामध्ये मंकीपॉक्सच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे.

महिलेला ताप आणि हाताला जखमा असून, तिला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलेचे नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बुधवारी त्या महिलेला संसर्ग झाल्याचे सांगितले.

राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत चार जणांमध्ये मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी केरळमध्ये पाच प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत 9 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. आतापर्यंत दिल्ली आणि केरळमधील रुग्णालयातून प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचवेळी केरळमध्ये संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

Monkeypox Outbreak 31 year old woman tests positive for monkeypox in delhi india tally rises to nine
शिवसेना-शिंदे गटाचा वाद 'व्हॉट्सऍप लेव्हल'वर; नीलम गोऱ्हेंना ग्रुपमधून काढलं

आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

मांकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज महामारी टाळण्यासाठी काय करावे आणि करू नये याची यादी जारी केली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात बराच काळ किंवा वारंवार येत असेल तर त्याला देखील संसर्ग होऊ शकतो.

मंत्रालयाने म्हटले आहे की संसर्ग टाळण्यासाठी संक्रमित व्यक्तीला इतर व्यक्तींपासून दूर ठेवावे. याशिवाय, हँड सॅनिटायझरचा वापर, साबण आणि पाण्याने हात धुणे, मास्क आणि हातमोजे घालणे हे काही उपाय आहेत जे रोग टाळण्यासाठी केले जाऊ शकतात. तसेच संक्रमित आढळलेल्या लोकांसोबत रुमाल, बेडिंग, कपडे, टॉवेल आणि इतर वस्तू शेअर करणे टाळावे. तसेच रुग्ण आणि संसर्ग नसलेल्या व्यक्तींचे कपडे एकत्र न धुण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, संक्रमित आणि संशयित रुग्णांमध्ये भेदभाव करू नका. याशिवाय कोणत्याही अफवा किंवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका.

Monkeypox Outbreak 31 year old woman tests positive for monkeypox in delhi india tally rises to nine
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून उसाला ३०५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.