नवी दिल्ली : कोरोना पाठोपाठ देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत, जागतीक आरोग्य संघटनेकडून देखील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमिवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यादरम्यान लस निर्मात्या अदार पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख पुनावाला म्हणाले की, या आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात स्माॉलपॉक्स लस आयात करण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यांनी असेही सांगितले की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मंकीपॉक्सचा मेसेंजर RNA (mRNA) लस विकसित करण्यासाठी Novavax शी चर्चा करत आहे. पूनावाला यांनी एनडीटीव्हीला बोलताना याबद्दल माहिती दिली आहे, त्यांनी सांगितले की, डेनमार्कची कंपनी बव्हेरियन नॉर्डिक (Denmark's Bavarian Nordic) ची स्मॉलपॉक्स लस तीन महिन्यांत भारतात येऊ शकते. सीरम इन्स्टिट्यूटकडील परवान्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात स्मॉलपॉक्स लस तयार करण्याची क्षमता आहे.
पूनावाला पुढे म्हणाले की, तांत्रिक ज्ञान असलेले लस उत्पादक म्हणून आम्ही भागीदारांशी बोलत आहोत. आम्ही नोव्हावॅक्सशी बोलत आहोत. आम्हाला खरोखरच खूप मागणी असेल की हे तीन ते चार महिन्यात संपून जाईल हे पाहण्याची गरज आहे. पुनावाला म्हणाले की, सुरुवातीपासून एक वॅक्सिन तयार करण्याच्या प्रक्रियेत एक वर्षापेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो. आपतकालीन परिस्थितीत आम्ही त्या कंपनीने बनवलेल्या उत्पादनाचे पूर्ण फिनिशिंग करू शकतो जी सुरक्षिततेची काळजी न करता भारतीयांपर्यंत पोहोचू शकते. सुरुवातीपासून ते तयार करण्यासाठी थोडा वेळ लागेल.
पूनावाला म्हणाले की, मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. हे अनेक दशकांपासून होत आहे. फरक एवढाच होता की जागतिक आरोग्य यंत्रणा संसर्गजन्य रोग शोधण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी अधिक प्रशिक्षित आणि सुसज्ज होती. मात्र, मंकीपॉक्स लस कोविड-19 लसीपेक्षा वेगळी आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला पुढे म्हणाले की, तुम्हाला त्या लसीसाठी special containment facilities ची आवश्यकता आहे. सध्या ती भारतात उपलब्ध नाही. यात बदल होऊ शकतो... आमच्याकडे काही सुविधा आहेत. आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत. याबद्दल बोलत आहे. आम्ही मंकीपॉक्ससाठी mRNA लस बनवू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.