धोका वाढतोय! आता आंध्र प्रदेशात आढळला 'मंकीपॉक्स'चा संशयित रुग्ण

देशात मंकीपॉक्सची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत.
Monkeypox Update
Monkeypox Update esakal
Updated on
Summary

देशात मंकीपॉक्सची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत.

हैदराबाद : देशात मंकीपॉक्सची (Monkeypox) प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. वाढत्या केसेसमुळं आता लोक घाबरत आहेत. दरम्यान, शनिवारी आंध्र प्रदेशातील गुंटूर (Andhra Pradesh Guntur) जिल्ह्यात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आलाय. आठ वर्षांच्या मुलामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली आहेत, त्यामुळं आरोग्य विभागात खळबळ उडालीय.

संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा मूळचा ओडिशाचा असून 15 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात आला होता. एका आठवड्यानंतर मुलाला खूप ताप आला.

Monkeypox Update
पुन्हा धोका वाढतोय! देशात 24 तासांत आढळले 20,408 नवे रुग्ण; 54 जणांचा मृत्यू

डॉ. प्रवीण कुमार (Dr. Praveen Kumar) यांनी सांगितलं की, 'स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागानं मुलाला पुरळ आणि मंकीपॉक्सची लक्षणं असल्याचं निदान केलंय. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून विलगीकरणात ठेवण्यात आलंय. मंकीपॉक्सची पुष्टी करण्यासाठी नमुना (रिपोर्ट) पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. अहवाल अद्याप आलेला नाही.' 27 जुलै रोजी देशात मंकीपॉक्सच्या चार प्रकरणांची पुष्टी झालीय. त्यापैकी तीन केरळ आणि एक दिल्लीतून आलेला आहे. केंद्र सरकारनं शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.