नवी दिल्ली : युरोपमध्ये (Europe) आढळलेले ‘सुपर-स्प्रेडर’ आणि देशामधील रुग्ण वेगळे आहेत, असे भारतात आढळलेल्या मंकीपॉक्सच्या (Monkeypox) पहिल्या दोन प्रकरणांमधील (Variant) नमुन्यांच्या आनुवंशिक अनुक्रमावरून दिसून आले आहे. यावरून हे दिसून येते की विषाणूचा एक वेगळा प्रकार आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV), पुणे येथील शास्त्रज्ञांनी, GISAID या जागतिक विज्ञान उपक्रमाच्या संशोधकांसाठी सार्वजनिक डेटाबेसवर मंकीपॉक्सचे आनुवंशिक अनुक्रम अपलोड केला आहे.
सध्या ७५ देशांमध्ये पसरलेल्या २० हजारांहून अधिक मंकीपॉक्स (Monkeypox) प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे (Variant) युरोपमधील ‘सुपर-स्प्रेडर’द्वारे पसरल्याचे मानले जात आहे. तसेच २०२२ मध्ये आढळलेले बहुतेक रुग्ण ‘B.१’ नावाच्या स्ट्रेनशी संबंधित आहेत. जगभरातील प्रकरणांचा एक छोटा समूह वेगळ्या प्रकाराशी ‘A.२’शी संबंधित असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत अनुक्रमित केलेले मोजकेच नमुने ‘A.२’चे आहे, असे सीएसआयआर-आयजीआयबीमधील (CSIR-IGIB) जीनोमिक शास्त्रज्ञांनी सांगितले. ‘A.२’ जीनोम यूएस आणि थायलंडमधील आहेत. ते युरोपशी (Europe) संबंधित कोणत्याही घटनांमधून उद्भवलेले दिसत नाही, असे आयजीआयबीचे सह प्रमुख जीनोमिक शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी सांगितले.
केरळमध्ये आढळलेले रुग्ण ‘A.२’ या प्रकाराचे आहे. ‘A.२’ प्रकरणाशी संबंधित काही प्रकरणांचा संबंध मध्य पूर्व किंवा पश्चिम आफ्रिकेशी संबंध असल्याचे दिसते, असे विनोद स्कारिया म्हणाले. यूएसएमधील सर्वांत जुने नमुने २०२१ मधील आहे. जे सूचित करते की हा विषाणू बऱ्याच काळापासून आणि युरोपियन घटनांपेक्षा पूर्वीच्या काळात पसरला आहे, असेही ते म्हणाले.
मागच्या महिन्यात अमेरिकेतील आनुवांशिक डेटावरून असे दिसून आले होते की, एकाच वेळी किमान दोन स्वतंत्र मांकीपॉक्स उद्रेक होत आहेत. ‘A.२’ हा प्रकार काही काळासाठी शांतपणे पसरला असेल. आता फक्त युरोपियन मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावामुळे समोर आला आहे, असेही विनोद स्कारिया म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.