Monsoon In Kerala: आला बाबा एकदाचा... मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल

Rainy Season 2024: 10 मे नंतर कधीही केरळच्या 14 केंद्रांवर आणि शेजारच्या भागात सलग दोन दिवस 2.5 मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो.
Monsoon In Kerala 2024
Monsoon In Kerala 2024ESakal
Updated on

नैऋत्य मान्सून अधिकृतपणे केरळमध्ये दाखल झाला आहे आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे, असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले. 31 मे च्या आधीच्या अंदाजाच्या तुलनेत मान्सून यंदा एक दिवस आधी दाखल झाला आहे.

केरळमधील कोट्टायम जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनच्या पहिल्या पावसाची नोंद झाली आहे. IMD नुसार, नैऋत्य मान्सून केरळला धडकला आहे आणि आज 30 मे रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पोहोचला आहे.

रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या 'रेमल' चक्रीवादळाने बंगालच्या उपसागराकडे मॉन्सूनचा प्रवाह खेचला आहे, ज्यामुळे ईशान्येकडे अवकाळी पाऊस पडू शकतो, असे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले.

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी मे महिन्यात जास्त पाऊस झाला. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे, तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये ही तारीख 5 जून आहे.

10 मे नंतर कधीही केरळच्या 14 केंद्रांवर आणि शेजारच्या भागात सलग दोन दिवस 2.5 मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, बाहेर जाणारे लाँगवेव्ह रेडिएशन कमी असते आणि वाऱ्यांची दिशा दक्षिण-पश्चिमेकडे असते तेव्हा IMD केरळमध्ये मान्सूनचे आगमन घोषित करते.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या अल निनोची स्थिती आहे आणि ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निनाची स्थिती निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.