यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागने जाहीर केला अंदाज

mansoon
mansoon
Updated on

त्याच्या अंदाजानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की यावर्षी नैऋत्य मान्सून हा सामान्य असेल. हवामान खात्याने सांगितले की, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 868.6 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD नुसार, 1971-2020 या कालावधीसाठी 87 सेंटीमीटरच्या दीर्घ काळ सरासरीच्या (LPA) 96 ते 104 टक्के पाऊस अपेक्षित आहे.

निम्मे भारतीय हे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत आणि भारतातील जवळपास 40% निव्वळ पेरणी क्षेत्राला सिंचनाची दुसरी सोय नाही. त्याचप्रमाणे, भारतातील निम्मे शेती उत्पादन मान्सूनवर अवलंबून असलेल्या उन्हाळी पिकांमधून येते. चांगल्या शेतमालाच्या उत्पादनासाठी, फक्त चांगला पाऊस होणे पुरेसे नसून तो सगळ्या राज्यांमध्ये समान प्रमाणात पडला पाहिजे.

IMD ने म्हटले आहे की दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) सुमारे 99% पाऊस पडला, ज्याचा एरर काऊंट +/- 5% आहे. इतकाच पाऊस या वर्षी अपेक्षित आहे. LPA हा 96-104% दरम्यान असल्यास त्या वर्षीचा मान्सून सामान्य मानला जातो.

या वर्षी, IMD ने 1971 ते 2020 दरम्यानच्या LPA कालावधीचा विचार करत आहे. मागील वर्षापर्यंत, LPA ची गणना 1961 ते 2010 या कालावधीत केली जात होती. त्यामुळे संपूर्ण भारतातील पडणारा वार्षिक सामान्य पाऊस पूर्वीच्या 1176.9 मिमीच्या तुलनेत आता 1160.1 मिमी असेल.

mansoon
तमीळनाडू BJPचे अध्यक्ष म्हणाले, "स्वत:ला भारतीय सिद्ध करण्यासाठी…"

आयएमडीने सांगितले की द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारतामध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. द्वीपकल्पाच्या ईशान्य, वायव्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD चे महासंचालक (हवामानशास्त्र) मृत्युंजय महापात्रा यांनी गेल्या वर्षीच्या आकडेवारीचा हवाला दिला आणि ऑगस्ट वगळता त्यांचा मान्सूनचा अंदाज मोठ्या प्रमाणात बरोबर असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मान्सून अखेरीस कमी असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, 2021 मधील पावसाचे निरीक्षण केले आणि त्याची जून ते सप्टेंबरच्या सामान्य अंदाजाशी तुलना केली, तर ते बर्‍याच अंशी बरोबर असल्याचे दिसून आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयएमडी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनसाठी अपडेटेड अंदाज जारी करेल. मंगळवारी, खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने देखील सांगितले की देशात सुमारे 98% एलपीए इतका सामान्य पाऊस होईल.

mansoon
गुगल देणार 12 हजार लोकांना नोकरी; जाणून घ्या कंपनीचा संपूर्ण प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.