Monsoon Update : मॉन्सून कारवारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी धडकणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

काहींशा विलंबानंतर आठ जून रोजी मान्सून केरळात (Monsoon Kerala) दाखल झाला.
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on
Summary

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे.

बंगळूर : काहींशा विलंबानंतर आठ जून रोजी मान्सून केरळात (Monsoon Kerala) दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy), अलनिनो तसेच अन्य काही घटकामुळे यंदा मान्सूनचा वेग काहीसा मंदावला होता; परंतु आता पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला असून आज तो कारवारला (Karwar) दाखल झाला आहे.

चक्रीवादळ बिपरजॉयचा दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनच्या प्रारंभावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी केरळमध्ये मॉन्सून सुरू झाल्याची घोषणा करून हवामानशास्त्रज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Monsoon Update
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळ; 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेलाच राहणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढील ४८ तासांत नैऋत्य मॉन्सून कर्नाटक (Karnataka), केरळ आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांत सरकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. चक्रीवादळ बिपरजॉय पुढील ३६ तासांत तीव्र होण्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने मच्छिमारांना केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे.

येत्या ४८ तासात मॉन्सून गोव्यात धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे. पुढील ४८ तासात बंगालचा उपसागर, ईशान्य राज्यांचा उर्वरित भाग, हिमालयचा पायथा आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये मॉन्सून सक्रीय होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

मात्र, अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यापासून सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात हे वादळ थैमान घालत असून आता गोव्याला धोका निर्माण झाला आहे. हे वादळ प्रतितास सात किलोमीटर तीव्र वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील २४ तासात चक्रीवादळाची शक्यता अधिक तीव्र होऊन ते उत्तर ईशान्येकडे हळूहळू सरकण्याची दाट शक्यता आहे.

Monsoon Update
Monsoon Season : मिरगाचा मुहूर्त टळला, आता पाऊस आणखी एक आठवडा लांबणार? शेतकरी चिंतेत

बंगळूरमधील आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याची स्थिती कायम राहिल्यास कर्नाटकात दोन दिवसांत मॉन्सूनचा पाऊस पडेल. केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर जवळजवळ ३ ते ४ दिवसांनी कर्नाटकात मॉन्सून सुरू होतो. सध्या केरळमध्ये चांगला पाऊस पडत आहे. कर्नाटकच्या काही भागांत विशेषत: किनारपट्टी आणि दक्षिण भागात मॉन्सून सक्रीय होण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडी (बंगळूर) येथील शास्त्रज्ञ प्रसाद ए. यांनी स्पष्ट केले.

Monsoon Update
Monsoon Season : यंदाही मॉन्सूनचं वेळापत्रक बदललं; खरीप हंगामातील शेतीवर होणार परिणाम

कर्नाटकमध्ये मॉन्सून सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. परंतु चामराजनगर आणि बंगळूर ग्रामीण आणि मलनाड भागात जूनमध्ये सामान्यपेक्षा किंचित जास्त पाऊस पडेल, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी रात्रीपासून मॉन्सून सरींचा गोव्यातील विविध भागात शिडकाव सुरू आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेडणे, त्या खालोखाल म्हापसा, पणजी, साखळी, कानकोण, दाभोळी, मोरगाव, सांगे आधी भागात मॉन्सून पूर्व पाऊस पडल्याचे निरीक्षण गोवा वेधशाळेने नोंदवले आहे.

Monsoon Update
Sharad Pawar : शरद पवारांच्या केसाला जरी धक्का लागला, तर..; जीवे मारण्याच्या धमकीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

गोव्यात उंच लाटांचा धोका

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे. ११ जूनपर्यंत गोव्यात ३.५ ते ४.१ मीटर उंच लाटा किनाऱ्याला धडकू शकतात, त्यामुळे गोव्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.