Monsoon Red Alert : किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा; आजपासून मुसळधार पावसाची शक्यता!

मेलई चक्रीवादळाचा परिणाम म्हणून नैर्ऋत्य मॉन्सून (Nairutya Monsoon) जोरात आहे.
Monsoon Rain
Monsoon Rainesakal
Updated on
Summary

१ जूनपासून राज्यात नेहमीपेक्षा ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मात्र, अधिक पाऊस पडणाऱ्या किनारपट्टी आणि डोंगराळ भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

बंगळूर : मेलई चक्रीवादळाचा परिणाम म्हणून नैर्ऋत्य मॉन्सून (Nairutya Monsoon) जोरात असून कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. आठवड्याच्या शेवटी पावसाचे (Monsoon Rain) प्रमाण वाढेल. किनारपट्टी आणि डोंगराळ भागांसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या (IMD) अंदाजानुसार आणखी चार दिवस पाऊस पडेल. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने (KSNDMC) किनारपट्टीवरील कर्नाटकसाठी रेड अलर्ट जारी केला असून २२ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Monsoon Rain
Hajj Pilgrims : उष्माघातामुळं तब्बल 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; कोल्हापुरातील 444 हज यात्रेकरू सुखरूप

केएसएनडीएमसीने चेतावणी दिली आहे, की राज्यभरात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि दुपारी आणि रात्री पाऊस पडेल.

केएसएनडीएमसीच्या सल्ल्यानुसार, कृष्णा खोऱ्यातील काही भागात २३ जून ते २६ जून या कालावधीत अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हवामानाचा अंदाजही जारी केला असून, कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडी बंगळुरचे संचालक सी. एस. पाटील यांनी सांगितले.

Monsoon Rain
Jhadani Case : झाडाणीतील तब्बल 620 एकर जमीन गुजरातच्या GST आयुक्तांकडून खरेदी; 'त्या' नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

१ जूनपासून राज्यात नेहमीपेक्षा ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मात्र, अधिक पाऊस पडणाऱ्या किनारपट्टी आणि डोंगराळ भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उत्तर आणि दक्षिण भागात अनुक्रमे ७८ टक्के आणि ८४ टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीपात्रातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बंगळुरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहील , दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.