Cyclone Biparjoy Alert : चक्रीवादळात स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या काही उपाय

चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) ताशी पाच किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे.
Cyclone Biparjoy Alert
Cyclone Biparjoy Alertesakal
Updated on
Summary

बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मात्र, चक्रीवादळाचा तडाखा बसू नये, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीच सतर्क राहावे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) ताशी पाच किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. गुरुवारपर्यंत ते गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात, तसेच पाकिस्तानच्या नजीकच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकते.

बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मात्र, चक्रीवादळाचा तडाखा बसू नये, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीच सतर्क राहावे. खाली असे काही उपाय दिले आहेत, ज्याची अंमलबजावणी करून कोणत्याही वादळाचा प्रभाव टाळता येईल.

तुमच्या घरात प्रथमोपचार, काही अत्यावश्यक औषधे, बँड-एड, हँड सॅनिटायझर, मास्क, हेल्मेट, कात्री, मेणबत्त्या, अतिरिक्त बॅटरी आणि काही विहित रोख रक्कम इत्यादीची व्यवस्था असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.

Cyclone Biparjoy Alert
धक्कादायक! सासूचं ऐकून मुलीनं आईचा घोटला गळा; ट्रॉली बॅगेत मृतदेह घालून थेट पोहोचली पोलिस ठाण्यात

चक्रीवादळाच्या इशारावर काय करावे?

तुमच्या घरात सैल टाइल्स, दरवाजे आणि काचेच्या खिडक्या नाहीत ना याची खात्री करा. काचेच्या खिडक्या असल्यास, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही लाकडी बोर्ड किंवा कागदाच्या पट्ट्या बांधा. वादळाबद्दल अफवा आणि चुकीच्या माहितीने घाबरून जाऊ नका. केवळ अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून रहा.

प्रत्येक इशाऱ्याकडे लक्ष द्या. विशेषत: पुढील 24 तासांसाठी सतर्क राहा. तुमचा मोबाईल पूर्ण चार्ज झाला असल्याची खात्री करा. रॉकेलने भरलेला कंदील, बॅटरीवर चालणारी टॉर्च, पुरेशा ड्राय सेल आणि ट्रान्झिस्टरसाठी अतिरिक्त बॅटरी ठेवा. तुमची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये सुरक्षित ठेवा.

Cyclone Biparjoy Alert
Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 'हे' 36 काँग्रेस नेते अडचणीत; कोर्टानं बजावलं समन्स

जीर्ण आणि जुन्या इमारतींमध्ये अजिबात राहू नका. त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. तुम्ही जिथे आहात तिथे मोठी झाडे किंवा हाय टेंशन वायर नाहीत याची खात्री करा. असतील तर चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर काही काळ ते ठिकाण सोडा. अत्यावश्यक अन्नपदार्थ आणि औषधे इत्यादींची घरीच व्यवस्था करा. भरपूर नाशवंत अन्न आणि स्वच्छ पाण्याचा साठा करा.

मच्छिमारांकडे सुट्या बॅटरीसह रेडिओ सेट असावा, बोटी सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवाव्यात आणि समुद्रापासून दूर राहावे. जर तुमच्याकडे पाळीव प्राणी, पक्षी असतील तर ते मोकळे ठेवा, त्यांना बांधू नका.

Cyclone Biparjoy Alert
Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

चक्रीवादळादरम्यान आणि नंतर काय करावे?

वीज, गॅस पुरवठा बंद करा. सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी उकळलेले किंवा क्लोरीनयुक्त पाणी प्या. खाली पडलेले विद्युत खांब आणि तारा किंवा इतर तीक्ष्ण वस्तूंपासून सावध रहा. तुम्ही शेल्टर होममध्ये असाल तर, घरी परतणे सुरक्षित आहे असे संबंधित अधिकारी सांगत नाही तोपर्यंत तिथेच रहा.

रोगांपासून लवकरात लवकर लसीकरण करा. वाहन चालवायचे असेल तर जपून चालवा. तुमच्या आवारात भंगार असेल तर ते ताबडतोब साफ करा. कोणत्याही प्रकारची हानी आणि धोक्याची आशंका याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.

Cyclone Biparjoy Alert
Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

चक्रीवादळात काय करू नये?

मदत बचाव पथकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका. तुटलेल्या घरात थांबू नका किंवा त्यांच्या जवळ राहू नका. ते पडण्याचा धोका असू शकतो. सखल समुद्रकिनारे किंवा उंच लाटांच्या संपर्कात असलेल्या ठिकाणी जाऊ नका.

वारा शांत झालेला दिसत असतानाही बाहेर पडू नका. वारा कधीही जोरदार येऊ शकतो. मदत पथक किंवा प्रशासनाला कळवल्यावरच बाहेर पडा. कारण, कधी कधी पावसामुळे वारा मंदावतो. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याची दिशा बदलणे सामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.