Monsoon Season : जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रात काय असणार मॉन्सूनची स्थिती? IMD चा नवा अंदाज समोर

मॉन्सूनची वाटचाल (Monsoon Season) थांबल्याने पावसातही खंड पडला आहे.
Monsoon Season Meteorological Department
Monsoon Season Meteorological Departmentesakal
Updated on
Summary

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा (Maharashtra Rain) काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे.

पुणे : मॉन्सूनची वाटचाल (Monsoon Season) थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) जाहीर केला आहे.

मात्र उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा (Maharashtra Rain) काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे. जूनमध्ये देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (९२-१०८ टक्के) अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता.

Monsoon Season Meteorological Department
आता 'सातबारा'वरही लागणार आईचं नाव; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, अर्जदाराला कोणते पुरावे द्यावे लागणार? जाणून घ्या..

मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

नैॡत्य मोसमी वारे यंदा १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाले. रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने सहा दिवस आधीच मोसमी वारे पूर्वोत्तर राज्यांत दाखल झाले. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) दाखल झालेल्या मॉन्सूनने अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत १२ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात मजल मारली. पूर्व भारतात ३१ मेनंतर आणि महाराष्ट्रात १२ जूननंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली असून तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो.

Monsoon Season Meteorological Department
'रवींद्र वायकरांचं जिंकणं शंकास्पद, त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नका'; 'या' पक्षानं थेट लोकसभा सरचिटणीसांना धाडली नोटीस

‘ला-निना’ची जुलैमध्ये शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आले आहे. या भागात जुलै महिन्यात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यांत ‘ला-निना’ तयार होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. हिवाळ्यातही ही स्थिती कायम राहणार असून, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात ‘ला-निना’ची शक्यता सर्वाधिक ८५ टक्के असल्याचे नोवा या अमेरिकन हवामान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.