Monsoon Update : दिल्ली, महाराष्ट्रासह 'या' 26 राज्यांत आज पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

दिल्ली-एनसीआरमध्ये आजही पावसाची शक्यता आहे.
Rain
RainSakal
Updated on
Summary

IMD नं पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीममध्ये वादळ आणि पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आजही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार (IMD), आज 23 जून रोजी दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहील.

22 जून रोजी दिल्लीत कमाल तापमान 37.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. गेल्या 24 तासांत दिल्लीत 2.4 मि.मी. पावसाची नोंद झालीये. आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून आता तेलंगणातील काही भाग, आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग तसेच झारखंड आणि बिहारमध्ये पुढं सरकला आहे.

Rain
Koyna Dam : कोयना धरणातून 50 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद; जलाशयात फक्त 10.82 टीएमसी साठा शिल्लक

मान्सून (Monsoon Rain) दक्षिण भारतातील ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढील 2-3 दिवसांत पुढं जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. IMD नुसार, आज ओडिशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

यासह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोकण-गोवा, किनारी कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणा इथं काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain
Karad : कोणीही पंढरपूरला येऊ शकतं, पण तिथं येऊन राजकारण करु नये; उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

IMD नं पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीममध्ये वादळ आणि पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज 23 जून रोजी विदर्भ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.