Morarji Desai Punyatithi : गोध्रा दंगलीने आयुष्य बदललं आणि थेट बनले पंतप्रधान

मोरारजी देसाई हे भारताचे पहिले असे पंतप्रधान होते जे काँग्रेस पक्षाचे नव्हते.
Morarji Desai Punyatithi
Morarji Desai Punyatithiesakal
Updated on

Morarji Desai Death Anniversary 2023 : काँग्रेस पक्षा शिवाय इतर पक्षाचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मोरारजी देसाई यांना मिळाला होता. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक वेळा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. १९७७ मध्ये जेव्हा निवडणुक जनता पक्ष जिकंला तेव्हा वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. ते पहिले गुजराथी होते जे पंतप्रधान बनले.

ते १९७९ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. ते लहानपणी हुशार विद्यार्थी होते. त्यांचा जन्म गुजारातच्या भदेली मध्ये म्हणजे आजच्या वलसाड जिल्ह्यात झाला.

जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव निघालं की, गोधरा आणि गुजरातच्या दंगलीचा उल्लेख होतो. पण हे फक्त नरेंद्र मोदींसोबत नाही तर देशाचे चौथे प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या सोबतही गोधराचं नाव जोडलं जातं. नवभारत टाइम्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार काय आहे संबंध जाणून घेऊया.

गोध्राशी काय आहे संबंध?

मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ मध्ये झाला. ते फार हुशार विद्यार्थी होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबई प्रांतीय नागरी सेवेत रुजू झाले. त्यानंतर ते अधिकारी बनले. मे १९१८मध्ये ते उपजिल्हाधिकारी म्हणून अहमदाबादला पोहचले. १९२७-२८ मध्ये ते गोध्रात डेप्युटी कलेक्टर म्हणून गेले. या काळात तिथे धार्मिक दंगली झाल्या. या दंगलीत मोरारजी देसाई यांच्यावर आरोप लावण्यात आला की, त्यांनी हिंदूंविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवला.

नंतर त्यांना दोषी ठरवण्यात आल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि मग स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. इथूनच त्यांची नवी सुरुवात झाली. शेवटी देशाचे पंतप्रधान झाले. ज्यावेळी जनता पक्ष जिंकला तेव्हा देसाई हे देशाचे असे पहिले पंतप्रधान होते जे काँग्रेस पक्षाचे नव्हते.

Morarji Desai Punyatithi
Narendra Modi : पंतप्रधानांनी जाहीर केली देशातील वाघांची नवीन आकडेवारी; भारतात सध्या किती वाघ?

स्वप्न झालं साकार

पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षातली शिस्त कमी झाली होती. काही लोक स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजायचे. यात मोरारजी देसाई होते. तर दुरीकडे लाला बाहादुर शास्त्रींसारखेही लोक होते जे पक्षाशी एकनिष्ठ होते. मोरारजींची ही नाराजी इंदिरा गांधींनी ओळखली होती. म्हणूनच त्यांना उपपंतप्रधान बनवलं होतं. पण त्यांना पंतप्रधान बनायचं होतं.

नोव्हेंबर १९६९ मध्ये जेव्हा काँग्रेसचं विभाजन काँग्रेस आय आणि काँग्रेस ओ मध्ये झाले. तेव्हा मोरारजी सिडीकेटच्या काँग्रेस ओमध्ये गेले. मग १९७५ मध्ये जनता पक्षात गेले मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं तेव्हा चौधरी चरण सिंह आणि जगजीवन राम यांना मागे टाकत पंतप्रधान झाले. यातून काँग्रेस विषयीची त्यांची नाराजी जगजाहीर झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.