Prime Ministership : त्या बातमीमुळे मोरारजी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून मागे पडले आणि लाल बहादूर शास्त्रींचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

शास्त्री यांच्या बाजूने सहमती जाहीर करणारे काँग्रेस अध्यक्ष के. कामराज
Prime Ministership
Prime Ministershipesakal
Updated on

Lal Bahadur Shastri Jayanti 2023 : पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी संसद भवनाबाहेर ही बातमी देणाऱ्या पत्रकाराला जाहीरपणे मिठी मारली होती. शास्त्री यांच्या बाजूने सहमती जाहीर करणारे काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांनी पत्रकाराचे आभार मानले होते. मात्र मोरारजी देसाईंनी त्या पत्रकाराला कधीच माफ केले नाही.

पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने लाल बहादूर शास्त्री यांच्या बाजूने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमाण दिले होते. पंतप्रधानपदासाठी निवड झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी संसद भवनाबाहेर ही बातमी देणाऱ्या पत्रकाराला जाहीरपणे मिठी मारली. शास्त्री यांच्या बाजूने सहमती जाहीर करणारे काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांनी पत्रकाराचे आभार मानले होते. त्याबद्दल मोरारजी देसाईंनी त्या पत्रकाराला कधीच माफ केले नाही. मात्र, पत्रकाराने वस्तुस्थितीच्या आधारे ती बातमी दिली असून त्यामागे त्याचा दुसरा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं होतं. ती बातमी नेमकी काय होती?

Prime Ministership
Himachal Travel : हिमाचलच्या कुशीतली सुंदर नगीना; तुम्ही इथे भेट दिलीत का?

प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर वारसाहक्कासाठी झालेल्या संघर्षाचा तपशीलवार उल्लेख केला आहे. यावेळी गृहसचिव व्ही. विश्वनाथन विशेषत: सतर्क होते. दिल्लीत तणावाचे वातावरण होते, त्यामुळे विशेष खबरदारी घ्यावी, असा संदेश त्यांनी राज्यांना दिला होता. लष्कराला सतर्क करण्यात आलं होतं आणि अधिकारी आणि सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. मात्र, बंडखोरी होईल असं काही वाटत नव्हतं.

Prime Ministership
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

लष्करप्रमुख जनरल जे.के. चौधरी आजारी होते. त्यांनी लष्कराच्या वेस्टर्न कमांडच्या सहा हजार जवानांना दिल्लीला बोलावले होते हे खरे आहे. पण चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, पंडितजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गर्दी नियंत्रित करणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्यांनी राष्ट्रपतींना याबाबत आधीच कळवले होते. गृहसचिव विश्वनाथन यांनी नंतर सांगितले की त्यांनी अफवा थांबवण्यासाठी सैन्याच्या मार्चपास्टचे आयोजन केले होते.नेहरूंच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच नेते पदासाठी मोरारजींनी दावा करायला सुरुवात केली.

Prime Ministership
Travel Tips : हॉटेल बुक करण्यापूर्वी 'या' छोट्या पण महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

पंडित नेहरूंच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यागराज मार्गावर असलेल्या मोरारजी देसाईंच्या बंगल्यावर प्रचंड गर्दी होती. तोपर्यंत नय्यर यांनी पी.आय.बी. वृत्तसंस्थेतील नोकरी सोडली होती आणि एएनआय मध्ये सामील झाले होते. पत्रकार या नात्याने ते तिथे पोहोचले. मोरारजी भाई यांना भेटणे शक्य नव्हते, पण त्यांनी देसाई यांचे पुत्र कांतीभाई आणि कट्टर समर्थक अर्थ राज्यमंत्री तारकेश्वरी सिन्हा यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या हातात खासदारांची यादी दिसली.

Prime Ministership
Travels Ticket : तिकीट दरवाढीचे ‘विघ्न’; ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केले दुप्पट भाडे

मोरारजी कोणत्याही परिस्थितीत नेतेपदासाठी निवडणूक लढवतील आणि निवडणूक सहज जिंकतील, असे उपस्थित समर्थकांनी सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरॉन, ओरिसाचे बिजू पटनायक, गुजरातचे बलवंत राय मेहता, बंगालचे पी सी सेन आणि सी.बी. गुप्ता यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मोरारजींसोबत होते. नय्यर हे लाल बहादूर शास्त्रींचे माहिती अधिकारी होते हे माहीत असलेले कांती देसाई म्हणाले, "तुमच्या शास्त्रींना सांगा स्पर्धा करू नका.

Prime Ministership
Travel Gadgets : फिरायला जाताय? सोबत ठेवा हे महत्त्वाचे गॅजेट्स! प्रवास होईल आरामदायक

शास्त्रींना सहमती हवी होती

नय्यर यांच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा ते लाल बहादूर शास्त्री यांच्या घरी गेले. शास्त्रीजी म्हणाले, "अजूनही निवडणुका झाल्या तर मी मोरारजींशी स्पर्धा करू शकतो आणि जिंकू शकतो, पण इंदिराजींसोबत नाही."त्यावेळी नय्यर यांनी सुचवलं की, या परिस्थितीत सरकारची सूत्रं हाती घेण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. सर्वानुमते नेत्याची निवड करणे बरे होईल, असा संदेश नय्यर यांना मोरारजींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शास्त्रींनी सोपवली. सहमती निर्माण करण्यासाठी शास्त्रींनी पहिले नाव जयप्रकाश नारायण आणि दुसरे नाव इंदिरा गांधी सुचवले होते.

Prime Ministership
Health Tips तुपासह गूळ खाण्याचे जबरदस्त फायदे

मोरारजी म्हणाले, इंदिरा एक मुलगी आहे.

मोरारजीभाईंनी लाल बहादूर शास्त्रींची सूचना साफ नाकारली. त्यांनी जयप्रकाश नारायण यांना "एक गोंधळलेली व्यक्ती" आणि इंदिरा गांधींना "एक लहान मुलगी" म्हणून नाकारलं. पक्षाचे अध्यक्ष के. कामराजही सहमतीसाठी प्रयत्न करण्यात मग्न होते. पक्षाने त्यांना या कामासाठी अधिकृत केले होते. खासदारांशी ते सतत बोलत होते. या संपूर्ण घटनेचे साक्षीदार कुलदीप नय्यर यांनी यूएनआयला ही बातमी दिली. ही बातमी प्रसिद्ध झाली.

Prime Ministership
Best Vastu Tips :घरात दक्षिण दिशेकडे या गोष्टी बांधू नका; शास्त्रात असं का सांगितलय?

बातमीत छापून आलं होतं की, "माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वप्रथम पंतप्रधानपदासाठी दावा जाहीर केला आहे. या पदासाठी उमेदवार असल्याचे त्यांनी सहकार्‍यांना सांगितल्याचे समजते. निवडणूक आवश्यक असून आपण या लढतीतून पायउतार होणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. मंत्री लाल बहादूर शास्त्री हे दुसरे उमेदवार मानले जात आहेत. मात्र त्यांनी स्वतः काहीच सांगितलेलं नाही. ते स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याच त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे."तेव्हा बातमीची शब्दाची ताकद मला कळली नाही.

Prime Ministership
Vastu Tips : गौराई देईल सुख-समृध्दी सौभाग्याचं दान, घरात करा फक्त एवढाच बदल

नय्यर लिहितात की, या छोट्याशा बातमीमुळे मोरारजी देसाईंचे इतके नुकसान होईल याची त्यांना कल्पना नव्हती.मोरारजी इतके महत्त्वाकांक्षी होते की पंडित नेहरूंच्या चितेची आग शांत होईपर्यंत त्यांनी संयम ठेवला नाही, असा संदेश या बातमीमुळे लोकांमध्ये गेला. मोरारजींच्या काही समर्थकांनी नंतर नय्यर यांना सांगितलं की या बातमीमुळे देसाई यांनी किमान शंभर खासदारांची मते गमावली होती.संसद भवनाच्या पायऱ्या उतरत असताना कामराज नय्यर यांच्या कानात 'धन्यवाद" कुजबुजले. लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना घरी बोलावलं आणि म्हणाले, "आता इतर कशाचीही गरज नाही. सामना संपल्यात जमा आहे."

Prime Ministership
Saree Fashion Tips : एकच साडी नेसायचा कंटाळा येतो, त्याच साडीला द्या नवा लुक, अशी नेसून पहा सगळेच कौतुक करतील

पुढे पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शास्त्रींनी संसद भवनाच्या बाहेरील पायऱ्यांवर नय्यर यांची गळाभेट घेतली. नय्यर यांच्या म्हणण्यानुसार, मोरारजी आयुष्यभर मानत राहिले की ही बातमी मी लाल बहादूर शास्त्रींच्या बाजूने लिहिली होती. नय्यर यांच्या स्पष्टीकरणाला उत्तर देताना मोरारजी म्हणायचे, "शास्त्रींची लोकांचा वापर करण्याची स्वतःची पद्धत होती आणि लोकांना त्याची जाणीवही नसायची."कामराज यांनी शास्त्रींच्या बाजूने सहमती जाहीर केली होती. मोरारजी नेहमी म्हणायचे की कामराजने "फेरफार" केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()