Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत नदीत उडी मारून वाचवले अनेकांचे प्राण; 'या' नेत्याला जनतेनं दिला आशीर्वाद!

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे.
Gujarat Assembly Election Result 2022
Gujarat Assembly Election Result 2022esakal
Updated on
Summary

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे.

Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला असून हळूहळू इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. राज्यात काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे, तर आम आदमी पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मतं मिळताना दिसत आहेत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे सर्व दिग्गज नेते आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडं मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या भाजप उमेदवाराला जनतेनंही आशीर्वाद दिले आहेत. वास्तविक, मोरबी येथील भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया (Kantilal Amrutiya) दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

Gujarat Assembly Election Result 2022
Himachal Election : 'हिमाचल'मध्ये कोण मारणार बाजी? काही तासांत चित्र होणार स्पष्ट, 'इथे' पहा निकाल

ऑक्टोबर महिन्यात मच्छू नदीवरील पूल कोसळला (Morbi Bridge Collapsed) होता. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओही समोर आले होते. यामध्ये ते लाईफ ट्यूब घालून जीव वाचवताना दिसत होते.

Gujarat Assembly Election Result 2022
Himachal Election : निकाल राहिला लांब कॉंग्रेसच्या 'या' नेत्या म्हणतात मीच होणार मुख्यमंत्री

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, पूल कोसळल्यानंतर लगेचच अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांना वाचवलं होतं. यानंतर पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवत मोरबीतून तिकीट दिलं. आज सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोरबी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया 10,156 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ 16 जागांवर आघाडीवर आहे, तर आप सहा जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, दोन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

Gujarat Assembly Election Result 2022
Himachal Election Results : हिमाचलातील निकालामुळं भाजपात खळबळ; महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याला पाठवलं शिमल्यात!

मोरबी दुर्घटनेनंतर भाजप सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते. 130 हून अधिक मृत्यूंचा समावेश असलेल्या या मोठ्या निष्काळजीपणाबाबत अनेक गोष्टी आता समोर आल्या आहेत. या पुलाची क्षमता 100-150 लोकांची असल्याचं सांगण्यात येत होतं. अपघाताच्या दिवशी या पुलावर क्षमतेपेक्षा 5 पट अधिक लोक प्रवास करत होते. यानंतर पूल तुटून अनेकांना जीव गमवावा लागला. गुजरात सरकारनंही अपघातातील मृतांना भरपाई जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.