४० हून जास्त जिल्हे पिछाडीवर; पंतप्रधान घेणार आज लसीकरणाचा आढावा

PM Narendra Modi
PM Narendra Modi Team eSakal
Updated on

नवी दिल्ली : लसीकरणात मागे पडलेल्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधल्या सुमारे ४० पेक्षा जास्त जिल्ह्यांबाबतचा आढावा ते आज बुधवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतील. लसीकरणाचे शंभर कोटींचे उद्दिष्ट किंवा विक्रम केल्यावर पंतप्रधानांच्या (Prime Minister) नेतृत्वाखाली भारताने आता सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने धडाक्याने पावले उचलली आहेत. देशातील ४० हून जास्त जिल्हे अजूनही लसीकरणात पिछाडीवर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आलेले फीडबॅक सांगत आहेत. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी नुकतीच याबाबत संबंधित प्रशासन प्रमुखांची आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत मिळालेल्या माहितीनंतर पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः या जिल्ह्यांमधील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी लक्ष घालण्याचे ठरवल्याचे या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

PM Narendra Modi
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ‘एसआयए’ स्थापण्यास परवानगी

विजयी मिरवणुका आणि गर्दी आवरा! ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्याच्या एकूण संख्येपेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे, त्याचप्रमाणे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचीही संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यांबाबतचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. यात ईशान्य भारताची राज्ये वगळता उर्वरित देशातून महाराष्ट्राचे व झारखंडचे, तुलनेने लसीकरण कमी झालेले जिल्हे असल्याचे यंत्रणेला आढळून आले. स्वाभाविकपणे पंतप्रधान मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांबरोबरच वरील दोन्ही राज्यांच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांबरोबरही संवाद साधतील.

PM Narendra Modi
यंदाच्या मॉन्सूनमध्ये १२५ वेळा अतिवृष्टी; गेल्या पाच वर्षांतील विक्रम

इटली-ब्रिटनच्या दौऱ्यावरुन परतले पंतप्रधान मोदी इटली आणि ब्रिटनच्या दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदी नुकतेच परतले आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. पर्यावरण बदलासंबंधीच्या संमेलनात बोलताना त्यांनी या संकटाशी दोन हात करण्यासाठी एक मोठं व्हिजन मांडलं आहे. ग्लासगोमध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशांच्या लोकांची देखील भेट घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोना लसीचे 107 कोटींहून अधिक डोस दिले गेले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत जवळपास 37,38,574 डोस देण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी सोमवारी म्हटलं होतं की, भारतातील 78 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस तर 38 टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()