HIV: 'या' राज्यात एचआयव्हीचे 800 हून अधिक विद्यार्थी पॉझिटिव्ह, 47 जणांचा मृत्यू, अचानक का वाढली संख्या?

HIV: या प्रकरणाची माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 47 विद्यार्थ्यांना धोकादायक संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे."
HIV
HIVEsakal
Updated on

त्रिपुरामध्ये ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेले अनेक विद्यार्थी देशभरातील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निघून गेले आहेत.

या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह सापडले आहेत. . त्यापैकी 47 विद्यार्थ्यांना धोकादायक संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. अनेक विद्यार्थी त्रिपुरातून देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले आहेत."

एचआयव्ही कसा पसरला ?

त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची तपासणी केली. जे इंजेक्शनद्वारे ड्रग्स घेतात. त्यामुळे एचआयव्हीचा प्रसार एकमेकांना होतो.

TSACS चे संयुक्त संचालक एएनआयशी बोलताना म्हणाले, “आतापर्यंत 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे ओळखली गेली आहेत जिथे विद्यार्थी ड्रग्ज घेत आहेत. आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांमधून डेटा गोळा केला आहे.”

HIV
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेत SITच्या अहवालानंतर CM योगींची मोठी कारवाई, एसडीएम-सीओ आणि तहसीलदारांसह 6 जण निलंबित

एचआयव्ही म्हणजे काय?

एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा एक विषाणू आहे. जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि तो इतका कमकुवत करतो की आपले शरीर इतर कोणत्याही संसर्ग किंवा रोगाचा सामना करू शकत नाही. त्याचबरोबर या विषाणूची लागण झाल्यावर वेळीच नियंत्रण न केल्यास तो एड्सचे कारण बनतो.

एड्स (ॲक्वायरड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) साठी अद्याप कोणतेही ठोस उपचार नाहीत. अशा परिस्थितीत हा विषाणू वेळीच ओळखणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

HIV
UP Crime: दिल्लीतून अपहरण बाघपतमध्ये हत्या; मृत तरुणाबरोबर काय घडले? थरकाप उडवणारे प्रकरण समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.