Cyber Attack Cases In India : भारतात या वर्षी जूनपर्यंत सायबर सुरक्षेशी संबंधित 670,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. 2019 पासून गेल्या महिन्यापर्यंत देशात अशी तीस लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या चार वर्षात देशातील सायबर सुरक्षेत 36.29 लाखांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केला आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेल्या उत्तरात मिश्रा यांनी वरील माहिती दिली आहे. (Cyber Attack News In Marathi)
मिश्रा म्हणाले की, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या (CERT-In) अहवालानुसार आणि ट्रॅक केलेल्या माहितीनुसार, 2019 ते जून 2022 पर्यंत देशात 36.29 लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. 2019 मध्ये सुमारे चार लाख, 2020 मध्ये 12 लाख, 2021 मध्ये 14 लाख आणि 2022 मध्ये सुमारे 6.74 लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, देशातील वाढते सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना आख्या जात असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सभागृहात सांगितले. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना करत आहे.
सरकारने मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना (CISOs) सायबर सुरक्षेतील महत्त्वाची भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. सर्व सरकारी वेबसाइट्स आणि अॅप्लिकेशन्स होस्ट करण्यापूर्वी सायबर सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी सरकारी वेबसाइट्स आणि अॅप्लिकेशन्सचे सायबर सिक्युरिटीशी संबंधित ऑडिटही नियमितपणे केले जाते. माहितीची सुरक्षा तपासण्यासाठी सरकारकडे ऑडिटिंग संस्था देखील असल्याचे मिश्रा यांनी यावेळी लोकसभेत स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.