भारतीय अर्थव्यवस्थेसाठी Good News ते हिंसाचारप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात FIR, वाचा ठळक घडामोडी एका क्लिकवर

Morning-News
Morning-News
Updated on

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चांगले संकेत दिले आहेत. आर्थिक वर्ष 2021-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था दोन अंकी विकास दर गाठेल, असा अंदाज आयएमएफने लावला आहे. तर मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांदरम्यान लाल किल्ला आणि आयटीओ परिसरात संघर्ष झालेला पाहायला मिळाला. याप्रकरणी 15 FIR दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थक लोकांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांच्या विरोधाचा आसरा घेत भारतीय दुतावासाच्या बाहेर आंदोलन केलं.

नवी दिल्ली : मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दरम्यान लाल किल्ला आणि आयटीओ परिसरात संघर्ष झालेला पहायला मिळाला. सविस्तर वाचा

नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत. आर्थिक वर्ष 2021-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था दोन अंकी विकास (Double Digit Growth) दर गाठेल, असा अंदाज आयएमएफने लावला आहे. सविस्तर वाचा

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान रात्री खडी टाकणारी मशीन रुळांवरून घसरल्याने मोठा अपघात झालाय. सविस्तर वाचा

सातारा : देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थक लोकांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांच्या विरोधाचा आसरा घेत भारतीय दुतावासाच्या बाहेर आंदोलन केलं. खलिस्तान समर्थकांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारत सरकारद्वारे भारतात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

ड्राय फ्रुटचं नाव घेताच अनेकांच्या नजरेसमोर काजू, बदाम, किशमिश असे पदार्थ येतात. आपण हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो, पण हे पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक विटॅमिन आणि मिनरल पूरवत असतात.  सविस्तर वाचा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात कट्टरपंथी इस्लामिक पक्षाच्या सदस्यांनी हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.  सविस्तर वाचा

औरंगाबाद : पासष्ट वर्षांच्या हसिना बेगम तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानमधून औरंगाबादला परतल्या आहेत. त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन cag.gov.in. वर निघाली आहे. सविस्तर वाचा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. सविस्तर वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.