Sanjeev Sanyal: "UPSC करणारे विद्यार्थी फुकटचा वेळ घालवत आहेत"; मोदींच्या आर्थिक सल्लागाराचं विधान

संघ लोकसेवा आयोगाची अर्थात युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होऊन देश उभारण्याच्या कामात हातभार लावण्याची स्वप्न भारतातील तरुण पाहत असतात.
Sanjeev Sanyal
Sanjeev Sanyal
Updated on

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाची अर्थात युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होऊन देश उभारण्याच्या कामात हातभार लावण्याची स्वप्न भारतातील तरुण पाहत असतात. यासाठी ते प्रचंड मेहनतही घेत असतात पण यातील सर्वच जण यशस्वी ठरतात असं नाही.

यासाठी बरेच फॅक्टर कारणीभूत असले तरी युपीएससी करणं म्हणजे वेळ घालवणं असा सूर आळवण योग्य नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार असलेले संजीव सन्याल यांनी अशाच पद्धतीचं एक विधान केलं आहे. त्यामुळं ते चर्चेत आले आहेत. (most of the students doing upsc are wasting time says modi financial adviser sanjeev sanyal statement aau85)

Sanjeev Sanyal
ByElection Cancelled: 'अकोला पश्चिम' विधानसभा पोटनिवडणूक हायकोर्टाकडून रद्द! काय घडलंय नेमकं जाणून घ्या

संजीव सन्याल हे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी म्हटलं की, "पुष्कळ भारतीय तरुण आपल्या जीवनातील महत्वाचा काळ हा युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी घालवतात. यांपैकी केवळ काही हजार जण ही परीक्षा पास होतात. पण जे यशस्वी होऊ शकत नाहीत अशा तरुणांनी इतर काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करावेत. याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. (Latest Marathi News)

Sanjeev Sanyal
Loksabha Election 2024: गांधी घराण्याचा 'हा' वारसदार काँग्रेसमध्ये परतणार? बड्या नेत्यानं दिली ऑफर

'पॉवर्टी ऑफ अॅस्पिरेशन' या विषयावर बोलताना सन्याल यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून भारताची फरफट झाली पण आता हळूहळू हे सर्वकाही बदलायला लागलं आहे. यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा दाखला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, ज्याप्रमाणे बंगालमध्ये छद्म विचारवंत आणि केंद्रीय नेते बनावं अशी तरुणांची आकांक्षा होती. त्याचप्रमाणे बिहारमध्ये स्थानिक गुंडांना राजकारणात येण्याची इच्छा होती. अशा वातावरणात तुम्ही एकतर स्थानिक गुंड बनू शकता, जर तुम्हाला गुंड बनायचं नसेल तर तुम्हाला सरकारी नोकरीत जाणं गरजेचं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sanjeev Sanyal
Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा झटका!

जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही इलॉन मस्क किंवा मुकेश अंबानी बनण्याचं स्वप्न पाहावं. सरकारी नोकरीत जाऊन सचिव होण्याचं स्वप्न का पाहता? जोखीम घेण्याची कोणाचीही तयारी नाही. मला वाटतं बिहारसारख्या ठिकाणची समस्या ही नाही की तिथं वाईट नेते होते, उलट तीच तिथल्या समाजाची इच्छा असल्याचं दिसतं. जर तुम्हाला वाईटच नेते हवे असतील तर तुम्हाला तेच मिळतील,” असंही सन्याल यांनी म्हटलं आहे. (Latest Maharashtra News)

Sanjeev Sanyal
IPL 2024 CSK vs GT : फक्त कर्णधार बदला... खेळ नाही... 'प्रिन्स'वर भारी पडला चेन्नईचा ऋतु'राज', CSK चा सलग दुसरा विजय

मला अजूनही असं वाटतं की खूप ऊर्जा असलेली बरीच तरुण मुलं यूपीएससी उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात आपला वेळ वाया घालवत आहेत. मी असं म्हणत नाही की, तरुणांनी यूपीएससी करण्याची स्वप्न पाहू नयेत. प्रत्येक देशाला नोकरशाहीची गरज असते, ते पूर्णपणे ठीक आहे. परंतू मला वाटतं की, लाखो लोक परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात आपली महत्वाची वर्षे वाया घालवतात, जिथे काही हजार लोक प्रत्यक्षात प्रवेश घेणार आहेत, यात काही अर्थ नाही.

जर त्यांनी तीच उर्जा आणखी काही करण्यात घातली तर आपण अधिक ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकू शकू, आपल्याला चांगले चित्रपट बनताना दिसतील, आपल्याला चांगले डॉक्टर दिसतील, आपल्याला अधिक उद्योजक आणि शास्त्रज्ञ पाहायला मिळू शकतील आणि असे बरेच काही दिसू शकेल, असंही संजीव सन्याल यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.