Road Accident : अवघ्या 12 तासांच्या आत आई-मुलाचा दोन वेगवेगळ्या अपघातात दुर्दैवी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

राणी देवी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी झाले होते निधन
Road Accident Rewa Madhya Pradesh
Road Accident Rewa Madhya Pradeshesakal
Updated on
Summary

दोघांवरही रेवा जिल्ह्यातील जत्री येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशच्या रेवामधून (Rewa Madhya Pradesh) एक दुर्दैवी घटना समोर आलीये. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. आई आणि मुलाचा अवघ्या 12 तासांच्या आत दोन वेगवेगळ्या अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे.

आईचा रेवा जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला, तर आईच्या अंत्यविधीसाठी इंदुरहून निघालेला मुलगाही अपघातात ठार झाला आहे. राणी देवी (वय ५५) असं अपघातात मृत्यू झालेल्या आईचं नाव आहे. तर, सूरज सिंग असं अंत्यविधीसाठी इंदुरहून (Indore) निघालेल्या मुलाचं नाव आहे.

Road Accident Rewa Madhya Pradesh
Ratnagiri Police : नीलिमाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा; घात की अपघात? लवकरच होणार स्पष्ट

दोघांवरही रेवा जिल्ह्यातील जत्री येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राणी देवी बुधवारी मुलगा सनी याच्यासोबत माहेरी जात होत्या. दरम्यान, १२ किलोमीटर दूर असलेल्या डुभौरा इथं त्यांना दुचाकीनं जोरदार धडक दिली. या वेळी जखमी राणी देवी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना रेवा इथं हलवण्याचा सल्ला दिला.

Road Accident Rewa Madhya Pradesh
मोठी बातमी! साताऱ्यात एक लाखाची लाच घेताना दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक; 'अवैध दारू'प्रकरणी केली होती लाचेची मागणी

दरम्यान, रेवा इथं उपचारासाठी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूची बातमी समजताच सूरज इंदुरहून आपल्या गावी मित्राच्या गाडीतून रवाना झाला. गावापासून सुमारे १०० किमी अंतरावर असताना सूरजच्या कारचा रामपूर इथं अपघात झाला. त्यामुळं आई आणि मुलाचा अवघ्या १२ तासांच्या आत अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.