मुलाला एकदा तरी छातीशी कवटाळूद्या; पण नाही...

mother cant attend son funearal due to lockdwon in indore
mother cant attend son funearal due to lockdwon in indore
Updated on

इंदोर (मध्य प्रदेश): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ सुरू केल्यापासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध भागांमध्ये अडकून पडले असून, त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण, एका मातेला आपल्या मुलाला शेवटचे जवळून पाहाताही आले नाही.

एक चौदा वर्षीय मुलगा आजारी पडला होता. वडील त्याला उपचारासाठी घेऊन येथील एका रुग्णालयात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे आईला त्याच्याकडे येता आले नाही. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी ताल येथे घेऊन जाऊ द्यावा, अशी विनंती वडिलांसह नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही.

शेवटी वडिलांसह तिथे असलेल्या नातेवाईकांनी मुलावर शहरामध्येच अंत्यसंस्कार कऱण्याचा निर्णय घेतला. यावेळी गावाकडे असलेल्या नातेवाईकांनी व्हिडिओ कॉल करून आई, बहीण आणि भावाला मुलाचे शेवटचे दर्शन दिले. बाप मुलाला मुखाग्नी देत होता आणि आईसह बहीण, भाऊ व्हिडिओ कॉलवर आक्रोश करत होते. मुलाला एकदा तरी छातीशी कवटाळूद्या, असे आई म्हणत होती. आईचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही रडू कोसळत होते. अखेर मुलावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले, यामुळे आईला मुलाला शेवटचे पाहताही आले नाही.

दरम्यान, मुलगा सातवीत शिकत होता. तो 2009 मध्ये शाळेच्या बसमधून पिकनिकसाठी गेला होता. त्यावेळी बस नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत सात मुलांसह शिक्षिकेचाही मृत्यू झाला होता. या 14 वर्षीय मुलाच्या मोठ्या बहिणीलाही दुर्घटनेत प्राण गमवावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.