आईचं खरं प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही.
आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे 'ईश्वर' या दोघांचा संगम म्हणजे 'आई' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते, त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होतं. आणि समाजाच्या दृष्टीनं ती त्या अपत्याची आई बनते. आईचं खरं प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे, जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या बाळाची भरपूर काळजी घेते.
झाशीत (Jhansi Police Station) ड्युटीवर असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लहान मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी तिचं कौतुक केलंय. डीजीपी ओपी सिंह (DGP OP Singh) यांनी अर्चनाच्या कामाच्या पद्धतीचं वर्णन प्रेरणादायी असल्याचं म्हंटलंय. ह्या बाळासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून आईचं कौतुक केलं जातंय. डीजीपी सिंह यांनी अर्चनाचं वर्णन 21 व्या शतकातील सर्वोत्तम स्त्री म्हणून केलंय. त्यांनी अर्चनाची आग्र्यात बदली करण्याचे आदेशही दिले आहेत.
याआधीही डेस्कवर झोपलेल्या बाळासोबत काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळीही लोकांनी अर्चनाचं खूप कौतुक केलं होतं. अर्चना ह्या झाशी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. अर्चनाचा नवरा बाहेर खासगी कंपनीत नोकरी करतो. ती सकाळी घरून मुलीसह ठाण्यात येते, तिथं ती मुलीची काळजी घेण्याबरोबरच ड्युटी बजावते. हे सगळं करत असताना तिला खूप त्रास सहन करावा लागतो, असं ती सांगते. अर्चनानं सांगितलं, की तिला दोन मुली आहेत. सासू-सासरे तिच्या दुसऱ्या मुलीची काळजी घेतात. सर्वात धाकटी मुलगी आता सहा महिन्यांची आहे. झाशी पोलीस ठाण्याचे आयजी सुभाष बघेल (IG Subhash Baghel) यांनीही अर्चनाचं कौतुक केलंय. त्यांनी अर्चनाच्या या भूमिकेला हजाराचं बक्षीसही दिलंय. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.