Relationship : जन्मदातीचा प्रताप! लेकीचं 'ब्रेकअप' होताच आईने जुळवलं तरुणासोबत सूत

Relationship
Relationship
Updated on

नवी दिल्ली : आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं पाहिली असतील, जी नात्यांची फारशी काळजी घेत. मात्र अजुनही पालक मुलांसाठी कोणताही त्याग करायला तयार असतात. मात्र एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका आईने आपल्या प्रेमासाठी मुलीच्या प्रेमाला सपशेल दुर्लक्षित केलं.

Relationship
Old Pension Scheme : 'जुन्या पेन्शनच्या निर्णयाबाबत आम्ही सकारात्मक, फक्त...' मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे वक्तव्य

आपल्या देशात प्रतिष्ठा आणि नातेसंबंधांचा खूप विचार केला जातो, पण परदेशात तसे होत नाही. एका आईला आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड आवडला, त्यानंतर तिने त्याच्यासोबतच आपलं नातं सुरू केलं. आपल्या मुलीला वाईट वाटेल याचीही पर्वा तिने केली नाही.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत नाते तुटल्यानंतर आईने तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करण्यास सुरुवात केली. मुलीच्या मैत्रिणीने हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिने सांगितले की, तिच्या मैत्रिणीचे दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत अफेअर होते, पण हे नाते तुटले. त्याचवेळी मुलीच्या आईचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईच मुलीच्या एक्ससोबत फ्लर्ट करायला लागली. विशेष म्हणजे ही गोष्ट तिने आपल्या मुलीपासून लपवून ठेवली होती.

Relationship
Satyajeet Tambe : तांबे नेमके कुणासोबत? विरोधकांच्या बरोबरीने सत्यजीत तांबेंचाही सभात्याग

आईच्या या कृतीची माहिती मुलीला कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. तिने आईशी बोलण्याचा ही प्रयत्न केला, पण आईने हे नातं तोडणार नसल्याचं सांगितलं. आईने आपल्या मुलीच्या दु:खाची पर्वाही केली नाही. सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत मुलीला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()