Mother's Day 2023: आजही राज ठाकरे जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांच्या आईला टेन्शन येतं... ; वाचा मायलेकाच्या नात्यातील गोडवा

MNS Raj Thackeray: मातृ दिनाच्या या मालिकेत आज आपण याच मायलेकांच्या नात्यातील गोडवा जाणून घेणार आहोत.
Mother's Day
Mother's Daysakal
Updated on

Mother's Day : राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव आहे की जेव्हाही मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईविषयी बोलले जाणार, तेव्हा प्रत्येकवेळी हे नाव समोर येणार.

मराठी भाषेला जपण्याचा आणि मराठी भाषा जनमानसात पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे.

अर्थातच त्यांच्यावर प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांचे संस्कार आहे पण त्यांच्या आयुष्यातील एका व्यक्तीला कधीच विसरता येणार नाही त्या म्हणजे त्यांच्या आई मधुवंती ठाकरे. आई ही असं व्यक्तीमत्त्व असते जी कायम पडद्यामागे राहून मुलांना घडवत असते. राज ठाकरेंच्या बाबतीत ही गोष्ट वारंवार जाणवते.

मातृ दिनाच्या या मालिकेत आज आपण याच मायलेकांच्या नात्यातील गोडवा जाणून घेणार आहोत. (Mothers Day special mns leader raj thackeray and his mother madhuwanti thackeray bonding relationship )

राज ठाकरे लहानपणी अभ्यासात तितके हूशार नव्हते. त्यामुळे त्यांच्या आईला नेहमी त्यांच्याविषयी काळजी वाटायची. उलट शाळेतून त्यांच्या तक्रारीही यायच्या. राज ठाकरेंनी घरीच अगोदरच सांगून ठेवले होते की त्यांच्याकडून डॉक्टर इंजिनिअरची अपेक्षा ठेवू नका.

एका मुलाखतीत राज ठाकरे सांगतात, " माझ्या दहावीच्या निकालाच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी आईची मस्करी करण्याचे ठरविले.

त्यांनी मी नापास झाल्याचे आईला सांगितले आणि हे ऐकताच आई रडायला लागली होती" या किस्स्यावरुन तुम्हाला जाणवेल की त्यांची आई किती भावनाप्रधान आहे आणि त्यांना सतत राज ठाकरे यांची काळजी वाटायची.

Mother's Day
Mother's Day : मोदींची आई धुणीभांडी करायची; वाचा संघर्षमय मायलेकराची कहानी

राज ठाकरे यांच्या भाषणाची शैली महाराष्ट्र आणि देशभर प्रसिद्ध आहे. त्यांच्या भाषणाचे अनेक चाहते आहेत. रोखठोक आणि आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने राज ठाकरे नेहमी भाषण करतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल राज ठाकरेंच्या आईंना मात्र राज ठाकरे जेव्हा भाषण करतात तेव्हा खूप टेन्शन येतं.

त्यांच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की राज हे कोणाबद्गल काय बोलेल... काय करेल.. याचं नेहमी टेन्शन असतं. त्यांची कोणतीही मीटिंग असली की टेन्शन येतं. हे त्यांच्या आईची त्यांच्याविषयीची काळजी आणि प्रेम आहे.

राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी याविषयी कुणालाच सांगितले नव्हते. त्यांच्या आईला सुद्धा हे दुसऱ्या दिवशी सकाळी कळले.

त्यांना काहीही माहिती नव्हतं. जेव्हा त्यांच्या आईला बाकीच्यांचे फोन यायला लागले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राजनी निर्णय घेतला, मी यावर काहीही बोलू शकत नाही.

राज ठाकरेंच्या आईंनी मुलाच्या निर्णयाचा आदर केला. त्याचे निर्णय त्याने घ्यावे आणि त्याने हा निर्णय घेतला, मी यात कधी पडायची नाही. अशा त्या स्पष्टपणे एका मुलाखतीत सांगतात.

Mother's Day
Mother's Day : स्वराज्याचं बीज शिवरायांच्या मनात पेरणाऱ्या माता जिजाऊ स्वत: देखील युद्धकलेत होत्या निपुण

राज ठाकरे यांच्या आई या उद्धव ठाकरे यांच्या मावशीसुद्धा लागतात म्हणजेच मधुवंतीताई या मीनाताई ठाकरे यांच्या धाकट्या बहिणसुद्धा आहे.

आज राजकीय परिस्थितीमुळे जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका पक्षात नसले किंवा त्यांची राजकीय मते जरी वेगवेगळी असली तरी मधूवंतीताई या कधीच उद्धव ठाकरे यांच्याशी वैर वागल्या नाही.

याचा प्रत्यय आला जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर मधूवंतीताईंनी व्यासपीठावर जाऊन त्यांना जवळ घेतलं होतं आणि त्यांना अश्रु अनावर झाले होते. एका मुलाखतीत त्या सांगतात की जेव्हा उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री पद गेलं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं.

Mother's Day
Mothers Day: मराठी अभिनेत्री सोनालीची ‘मायलेक’ ची घोषणा

राज ठाकरे यांच्या आई कधीच कोणत्याच कारणाने मीडियासमोर चर्चेत आल्या नाही पण त्यांची शिकवण ही नेहमी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून आली.

त्यांनी घडवलेले असे राज ठाकरे कदाचित पुन्हा कधीच या महाराष्ट्राला लाभणारही नाही पण जेव्हा जेव्हा राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलल्या जाईल, लिहल्या जाईल तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी त्यांच्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.