MP Assembly Election 2023: स्थलांतरितांना मतदानासाठी बोलाविण्याचे आव्हान; बाहेरील राज्यांत आयोगाची पथके रवाना

MP Assembly Election 2023
MP Assembly Election 2023
Updated on

MP Assembly Election 2023:  रोजगारासाठी देशभरातील विविध राज्यांत स्थलांतरित झालेल्या मध्यप्रदेशातील लोकांना मतदानासाठी  राज्यातील त्यांच्या मूळ गावी येण्यासाठी प्रोत्साहन देणे हे सध्या निवडणूक आयोगासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

राज्याबाहेर असलेल्या नागरिकांना मतदानासाठी राज्यात बोलाविण्यासाठी अलीराजपूर येथे प्रशासनाच्या वतीने विशेष कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील भिली येथे, राज्याबाहेर असलेल्या आदिवासी नागरिकांना मतदानासाठी मूळ गावी बोलविण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी आकर्षक पोस्टर लावण्यात आली आहेत.

या मोहिमेबद्दल माहिती देताना अलीराजपूरचे जिल्हाधिकारी अभय बेडेकर म्हणाले, ‘‘आम्ही २० जणांचा समावेश असलेले कॉल सेंटर सुरू केले असून अलीराजपूर जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार स्थलांतरित मजूरांना मतदानासाठी मूळ गावी येण्याचे आव्हान केले जात आहे. यासाठी या सर्व स्थलांतरितांचे मोबाईल क्रमांक मिळविण्यात आले आहेत.’’

यापैकी बहुतांश नागरिक हे शेजारील गुजरात, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांत मजुरी करत आहेत. हे मजूर ज्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्या कंपन्यांच्या मालकांना संबंधित मजूरांना मतदाना दिवशी  पगारी रजा देण्याची मागणी करण्यात आली आहे असेही बेडेकर यांनी सांगितले. (Latest Marathi News)

यासाठी प्रशासनाच्या वतीने गुजरातमध्ये पथके देखील पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. अलीराजपूर येथे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ५२.८४ टक्के मतदान झाले होते. या जिल्ह्यातील  स्थलांतरित नागरिकांची संख्या अधिक असल्याने मतदान कमी झाले असल्याचे मानले जात असल्याने प्रशासनाने या निवडणुकीमध्ये परराज्यातील मतदारांना राज्यात मतदानासाठी येण्याचे आवाहन केले असून यासाठी विशेष मोहीम राबविली आहे.

MP Assembly Election 2023
केरळ बॉम्बस्फोटात विदेशी विद्यार्थ्यांवर संशय? गुप्तचर विभागाची करडी नजर, परदेशी विद्यार्थींची मागवली यादी

विशेष गाणी आणि घोषवाक्ये

परप्रांतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी मूळ गावी येण्यासाठी विशेष घोषवाक्ये, भित्तिपत्रके आणि गाण्यांची रचना देखीलकरण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील  आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक अनिल तन्वर यांनी मतदानासाठी आवाहन करणारे विशेष गीत लिहिले आहे.

या राज्यांत स्थलांतर

महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान

या जिल्ह्यांतून सर्वाधिक स्थलांतर


अलीराजपूर
धार,
झाबुआ,
खरगोन
बरवानी

स्थलांतरितांची संख्या

एकूण मतदार : ५२.६६ लाख
परप्रांतात गेलेले नागरिक : ८५ लाख
मतदारसंघ : अलीराजपूर, जोबट

MP Assembly Election 2023
Gold Rate Today: खुशखबर! करवा चौथच्या एक दिवस आधी सोने झाले स्वस्त; काय आहे आजचा भाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.