MP Assembly Election: ओबीसी समाजाचा नेता म्हणवून घेणारे मोदी आता गप्प का ? राहुल गांधींचा घणाघात

केंद्राच्या धोरणांमुळे बेरोजगारीत वाढ
rahul gandhi narendra modi obc
rahul gandhi narendra modi obc
Updated on

सतना : ‘‘जातिनिहाय सर्वेक्षण हे मोठे क्रांतिकारी पाऊल असून  यामुळे लोकांचे जीवन बदलणार आहे.’’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील सतना येथे आयोजित सभेत केला. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढल्याचेही राहुल म्हणाले.

‘‘मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही सर्वात प्रथम जातिनिहाय सर्वेक्षण करू,’’ असा दावा राहुल गांधी यांनी सतना येथील प्रचारसभेत केला आहे. जातिनिहाय जनगणना ही एक्स रे प्रमाणे इतर मागासवर्गीयांची सद्यःस्थिती स्पष्ट करून त्यांच्यासाठी धोरणे ठरविण्यासाठी उपयुक्त आहे, असे राहुल म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी हे यापूर्वी बोलताना कायम स्वतःचा उल्लेख ओबीसी समाजातील नेता असाच करायचे परंतु काँग्रेसने ‘जातिनिहायची’ मागणी केल्यापासून पंतप्रधान याबाबत काहीही बोलले नाहीत.’’ भारतीय प्रशासकीय सेवेतील जे ५३ अधिकारी मध्य प्रदेश चालवतात त्यांच्यापैकी केवळ एक अधिकारीच ओबीसी आहे.’’

लघु उद्योगातून रोजगार निर्मिती

राहुल गांधी म्हणाले की, ‘‘देशात मोठ्या उद्योगधंद्यांपेक्षा लघू आणि मध्यम उद्योग धंदे हेच खऱ्या अर्थाने देशात रोजगार निर्माण करतात. मात्र जीएसटीमुळे या उद्योगधंद्यांना फटका बसला असून त्यामुळे  रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे.’’

rahul gandhi narendra modi obc
"शिंदेंच्या महालाचे चौपाटीत रूपांतर करू, जर..."; लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्याचा इशारा
  • कर्जबाजारीपणाला कंटाळून मध्य प्रदेशात मागील १८ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

  • नोटाबंदी व ‘जीएसटी’चा देशातील लघू आणि मध्यम उद्योजकांना फटका

  • ओबीसी, दलित आणि आदिवासींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रशासनात सहभाग मिळायला हवा

  • पीक विम्याचे पैसे १६ खासगी कंपन्यांना दिले

  • भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी भेटून व्यथा मांडल्या

  • कृषी अवजारे आणि ट्रॅक्टरवर जीएसटी लावल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड

rahul gandhi narendra modi obc
Eknath Shinde: चार राज्यांतील निवडणूक प्रचारात CM शिंदे सामील होणार; भाजपला दिला पाठिंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.