MP Assembly Election: काँग्रेसला बंडखोरीचा धसका! चार मतदारसंघातील उमेदवारांत वेळेवर बदल

MP Assembly Election
MP Assembly Election
Updated on

नवी दिल्ली/भोपाळ: मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर अनेक मतदारसंघात पक्षांतर्गत असंतोष दिसत असल्याने पक्षश्रेष्ठींना बरीच धावपळ करावी लागली. बंडखोरीची लागण होऊ नये यासाठी आज काँग्रेसने चार उमेदवार बदलले. आतापर्यंत सात जागांवरील उमेदवारीत बदल केला आहे. यापूर्वी तिघांची नावे बदलण्यात आली होती.

काँग्रेसने आज तिसरी यादी जारी केली असून त्यात सुमावली, पपिरिया, बडगनगर आणि जावरा मतदारसंघातील विद्यमान उमेदवारांची तिकिटे कापली आहेत. यानुसार सुमावलीत कुलदीप सिकरवार यांच्या जागी अजब सिंह कुशवाह यांना तिकीट दिले आहे. २०२० मध्ये कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कुशवाह विजयी झाले होते. पण यंदा तिकीट न मिळाल्याने कुशवाह यांनी समर्थकांसह रॅली काढली.

पिपरिया येथून गुरुचरण खरे यांच्या जागी विरेंद्र बेलवंशी यांना, बडनगर येथून राजेंद्र सिंह सोलंकी यांच्या ठिकाणी मुरली मोरवल आणि रतलाम जिल्ह्यातील जावरा येथून हिंमत श्रीमाल यांच्या जागी वीरेंद्र सिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे. सोलंकी यांच्या समर्थकांनी श्रीमाल यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

तत्पूर्वी १९ ऑक्टोबर रोजी तीन उमेदवारांची तिकिटे बदलली होती. काँग्रेसने दुसऱ्या यादीत बदल करताना कमलनाथ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष राहिलेले नर्मदा प्रसाद प्रजापती यांना नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगाव (राखीव) येथून उमेदवारी जाहीर केली. दतिया येथून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याविरुद्ध राजेंद्र भारती आणि पिछोर येथून शैलेंद्र सिंह यांच्या जागी अरविंद सिंह लोधी यांना तिकीट जाहीर करण्यात आले. काँग्रेसने भाजपमधून आलेल्या नेत्यांना पक्षात विशेष स्थान दिले. तिकीट वाटपात ही बाब प्रकर्षाने पाहवयास मिळाली आहे.

MP Assembly Election
Gunratna Sadavarte:गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक

काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत भाजपमधून आलेले चार नेते दीपक जोशी, अभय मिश्रा, समंदर पटेल आणि भंवर सिंह शेखावत यांना उमेदवारी दिली आहे. यात शेखावत हे ज्योतिरादित्य शिंदे समर्थक मानले जातात. त्याचवेळी दीपक जोशी यांचे वडील कैलास जोशी हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना तिकीट देताना बरेच औदार्य दाखविले आहे. रीवा जिल्ह्याचे अभय मिश्रा यांची देखील लॉटरी लागली आहे. त्यांनी एक दिवस अगोदर भाजप सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर अभय मिश्रा यांना सिमरिया मतदारसंघातून तिकीट दिले आहे. (Latest Marathi News)

आमलाचा पेच कायम

बैतूल जिल्ह्यातील आमला या मतदारसंघात उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा बांगरे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. परंतु त्यांचा राजीनामा स्वीकृत न झाल्याने काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी उमेदवार घोषित केला आहे. निशा बांगरे यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेतली. मध्य प्रदेशात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे या मतदारसंघातूनही काँग्रेस उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे निशा बांगरे यांनी जाहीर केले आहे. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे.

MP Assembly Election
मोठी बातमी! अमेरिकेच्या लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 ठार तर 60 नागरिक गंभीर जखमी, हल्लेखोराचा Photo केला जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.