MP Election : २०१८ मध्ये भाजपला सत्तेत बसवलेल्या शिंदेंमुळे दुफळी? विधानसभेपूर्वी राजकारण तापलं

MP Assembly Election 2024 jyotiraditya scindia  shivraj singh chouhan bjp MLA political news rak94
MP Assembly Election 2024 jyotiraditya scindia shivraj singh chouhan bjp MLA political news rak94
Updated on

देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राजस्थान, मिझोरम, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगढ या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. यादरम्यान मध्य प्रदेशात भाजपमध्ये हलचाली वाढल्या असून पक्षात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्य प्रदेश निवडणुकांबद्दल बोलायचे झाल्यास मार्च 2020 पासून ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशच्या राजकारणाचे केंद्रस्थानी आले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या समर्थक 22 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला अन् मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळले. तेव्हापासून, भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना पचनी पडलेली नाहीये. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नेहमीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी धोका म्हणून पाहिले जाते.

आगामी मध्य प्रदेश निवडणुकीत शिंदे यांच्यासोबत आलेल्या 22 आमदारांपैकी जवळपास 50 टक्के आमदारांना भाजपने तिकीट दिले आहे. उर्वरित, काहींना तिकीट नाकारण्यात आलं असून काही जण होल्डवर आहेत. यामुळे मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. ही निवडणुकीसाठी मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

MP Assembly Election 2024 jyotiraditya scindia  shivraj singh chouhan bjp MLA political news rak94
MP Assembly Election 2023: मोदींची कात्री कुणावर चालणार? 67 जागा ठेवल्या राखून मंत्र्यांसह दिग्गजांचा समावेश

कोणाला मिळालं तिकीट?

ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या राज्यातील ग्वाल्हेर-चंबळ प्रदेश पुन्हा सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. या प्रदेशात विधानसभेच्या 34 जागा आहेत. येथे 2018 च्या निवडणुकीत, काँग्रेसने 26 जागा जिंकल्या होत्या, यानंतर तब्बल 15 वर्षानंतर राज्यात काँग्रेस सत्तेत परत येण्यात यशस्वी ठरला होता.

या निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या शिंदेंच्या समर्थकांमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर, चंबळ येथील सुमावली आणि मुरैना येथील दोन्ही गुर्जर नेते अदल सिंग कंसाना आणि रघुराज सिंग कंसाना यांचा समावेश आहे. 2018 मध्ये पक्षांतर झाल्यानंतर पोटनिवडणुकीत दोघेही पराभूत झाले होते.

MP Assembly Election 2024 jyotiraditya scindia  shivraj singh chouhan bjp MLA political news rak94
MP Election : शिवराजसिंहांसमोर काँग्रेसचे मोठे आव्हान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचे काय होणार?

तर शेजारच्या धार जिल्ह्यात, येथे दाटीगाव येथे लढत होणार असून 2018 च्या निवडणुकीचे भाजपचे उमेदवार भंवर सिंग शेखावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि ते माजी उमेदवारांना आव्हान देण्यासाठी तयार आहेत.

पक्षाने किमान 11 त्यांचा पक्षात बंडखोरी करून भाजपमध्ये दाखल झालेल्यांना तिकीट नाकारले आहे किंवा त्यांची नावे होल्डवर ठेवली गेली आहेत. त्यात गिरराज दंडोतिया यांचा समावेश आहे ज्यांनी मुरैना येथील डिमनी येथून निवडणूक लढवली होती, परंतु भाजपने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना उमेदवारी दिल्याने आता त्यांना डावलण्यात आले आहे.

प्रल्हाद पटेल आणि फग्गनसिंग कुलस्ते या दोन केंद्रीय मंत्र्यांसह तोमर आणि आणखी सहा विद्यमान खासदारांना भाजपने विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. तिकीट नाकारले गेलेले आणखी एक शिंदे समर्थक गोहड येथील रणवीर जाटव आहेत.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ऐक्याचे अनेक प्रयत्न करूनही, ज्योतिरादित्य शिंदे आणि नाराज भजपा यांच्यातील दुरावा वाढला आहे. कमलेश जाटव, ओपीएस भदोरिया, मुन्नालाल गोयल, रक्षा सिरोनिया, सुरेश धाकड, ब्रजेंद्र यादव, जजपालसिंग जज्जी आणि ब्रजेंद्र यादव यांच्यासह अनेक नेते उमेदवारी मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मध्यप्रदेशात भाजपचा विजय झाल्यास, शिवराज सिंह चौहान, तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि प्रल्हाद पटेल यांच्यासह अनेक मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. मात्र यापैकी कोणाला एकालाच मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील का? ते पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.