MP Assembly Election : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपत्रिकेच्या पेटीत बंद झाली. राज्यभर भाजप आणि काँग्रेस यांच्या अत्यंत अटीतटीची लढती रंगल्या आहेत.
मतदानानंतरही दोन्ही पक्षांच्या दिग्गजांना बहुमताचा अंदाज बांधता आलेला नाही त्यामुळे सर्वांचे लक्ष आता तीन तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या निकालाकडे लागले आहे. (MP Assembly Election All are now waiting for results of counting of votes to be held on 3rd news)
मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी शुक्रवारी राज्यात मतदान झाले. यावेळी राज्यभर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच प्रामुख्याने लढती रंगल्याचे दिसून आले. भाजपा विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेसने घेतला.
यामुळे राज्यातील काही प्रांतात काँग्रेससाठी पोषक वातावरण राहिले. तर दुसरीकडे भाजपाने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडली बेहना योजना सुरू करीत महिलांच्या खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा करणे सुरू केल्याने महिला मतदार भाजपच्या बाजूने झुकल्याचे दिसले. असे असले तरी भाजपाला एकतर्फी वाटावी असा निवडणुकीचा निकाल येण्याची शक्यता कमी आहे.
राज्यात सरासरी 72 टक्के मतदान झाले आहे. अनेक जागांवर चुरशीच्या लढती झाल्या आहे. एकतर्फी विजयी होण्याच्या जागा अत्यंत कमी असल्याने सरकार कोणाचे होणार हे आत्ताच सांगणे दिग्गजांनाही शक्य होताना दिसत नाही.
तरीही काँग्रेस आणि भाजपा आपापल्या विजयाचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत असले तरी येत्या तीन तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
भाजपात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच
या निवडणुकीत प्रथमच भाजपाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर आणलेला नाही. तर काँग्रेसने कमलनाथ यांनाच मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर आणले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असले तरी भाजपकडून मात्र त्यांच्याबाबत नाराजी असल्याचे बोलले जाते.
त्यामुळेच संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून शिवराम सिंह चौहान यांना प्रोजेक्ट केलेच नाही. त्यामुळे आत्तापासूनच इंदूरमधून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलास विजयवर्गी, मुनेर म्हणून तब्बल वीस वर्षांनी राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. भाजपला बहुमत मिळाल्यास मध्य प्रदेश राज्याला नवा चेहरा मुख्यमंत्री दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.